चिंचपाडा येथे ८० हजारांची घरफोडीने उडाली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:52 PM2020-12-27T12:52:51+5:302020-12-27T12:53:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :  नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील एका शिक्षकाच्या घरी सर्व कुटुंब वरच्या मजल्यावर झोपलेले असताना मध्यरात्रीच्या ...

80,000 burglary in Chinchpada | चिंचपाडा येथे ८० हजारांची घरफोडीने उडाली खळबळ

चिंचपाडा येथे ८० हजारांची घरफोडीने उडाली खळबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी :  नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील एका शिक्षकाच्या घरी सर्व कुटुंब वरच्या मजल्यावर झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कुलूप तोडून ८० हजार रुपयांची रोख रक्कमसह  साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली.
  तालुक्यातील चिंचपाडा येथील आदर्श शिक्षक कॉलनीतील माध्यमिक शिक्षक प्रकाश मुझगे यांच्या घरातील सर्वजण वरच्या मजल्यावर झोपले होते. यावेळी चोरट्यांनी तळघरातील मुख्य दाराचे कुलूप-कडी तोडून घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील कपाटाच्या तिजोरीचा दरवाजा तोडून २२ हजार रुपये रोख, लॅपटॉप, साड्या, चांदीचे दागिने, असा एकूण जवळपास ८० हजाराचा माल लंपास केला आहे. यावेळी घरात ठेवलेले काजू-बदामवर देखील चोरट्यांनी ताव मारला आहे. काजू बदाम खात चोरट्यांनी चोरी करून पसार झाल्याचे चर्चा होत आहे. 
या परिसरातील ही पाचवी चोरीची घटना आहे. चिंचपाडा पोलिसांना रात्री गस्त घालण्याची वारंवार विनंती करून देखील परिसरात पोलिसांकडून रात्री पेट्रोलिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही असा आरोप होत आहे. 
चोरीच्या घटनेची सकाळी पाच वाजता चिंचपाडा पोलिसांना माहिती देऊन देखील आठ वाजता सदर घटनेची दखल घेतली.  या घटनेची पोलिसांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी तसेच परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी पोलिसांना नागरिकांनी केली आहे.

Web Title: 80,000 burglary in Chinchpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.