सीडबॉलच्या माध्यमातून 80 हजार बिजांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:17 PM2018-07-29T13:17:04+5:302018-07-29T13:17:10+5:30

व्हीएसजीएमचा उपक्रम : जलमंदिर पूजनाबरोबरच वृक्षारोपणाला गती

80,000 seedlings planted through Seedball | सीडबॉलच्या माध्यमातून 80 हजार बिजांचे रोपण

सीडबॉलच्या माध्यमातून 80 हजार बिजांचे रोपण

Next
<p>नंदुरबार : दुष्काळावर मात करण्यासाठी जलमंदिरांची अर्थात (गावतलाव) निर्मिती केली पण पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची चळवळही हाती घेण्यात आली आहे. विशेषत: सीडबॉलचा उपक्रम गावोगावी राबवला जात असून त्या माध्यमातून यंदा 80 हजार बिजे रोवण्याचा          प्रयत्न असल्याची माहिती विविध शहर ग्राम गुजर मंडळ अर्थात व्हीएसजीएमचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी दिली.
करणखेडा, ता.नंदुरबार येथे जलमंदिराच्या पूजनानिमित्त सीडबॉलचा उपक्रम राबविण्यात आला. याठिकाणी 500 सीडबॉल वाटप करण्यात आले असून त्याचे रोपण करण्यात येणार आहे. या वेळी आर्ट ऑफ लिव्हींगचे किशोर पाटील, अनिल विठ्ठल पाटील, नरेंद्र पाटील, शीतल पाटील,  कृषीभूषण पाटीलभाऊ माळी, हरी पाटील, माधव पाटील, विनोद पाटील, दीपक पाटील, बळीराम पाटील, छोटू  पाटील, प्रशांत पाटील, कल्याण पाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते. 
या वेळी कृष्णा पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, व्हीएसजीएमतर्फे र्सवकष शाश्वत विकासावर आधारित उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी सीडबॉलचा उपक्रम यशस्वी            झाला. विशेष खत, मातीचा वापर करून हे सीडबॉल तयार करण्यात आले आहेत. ते पडीक जागेवर           कुठेही फेकले तरी त्यातील रोप उगवतील. त्यामुळे 1600 गावांमध्ये प्रत्येकी 500 सीडबॉल वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. यापूर्वी गावोगावी श्रमदानातून व लोकवर्गणीतून जलमंदिरांची           निर्मिती करण्यात आली आहे. ही जलमंदिरे सध्या पाण्याने भरली असून त्यामुळे गावोगावी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्साह टिकून रहावा व त्या माध्यमातून भविष्यातील संकटांवर मात करता यावी यासाठी वृक्षारोपणाची चळवळही सुरू आहे. जलमंदिरांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात          येणार आहे. याशिवाय किमान             दोन एकर शेती असलेल्या  शेतक:यांना आपल्या बांधावर 20 झाडे लावावीत हा उपक्रमही  लवकरच हाती घेणार असून त्याची जनजागृती सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. 
या वेळी किशोर पाटील व अनिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गुजरजांबोली, भवाली, अडछी, नळवे, करजकुपे, सुंदरदे, करणखेडा आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: 80,000 seedlings planted through Seedball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.