बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा 83 टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:19 PM2019-05-29T12:19:48+5:302019-05-29T12:20:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे (बारावी) निकाल मंगळवारी जाहिर करण्यात ...

83 percent results of the examination in the XII examination | बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा 83 टक्के निकाल

बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा 83 टक्के निकाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे (बारावी) निकाल मंगळवारी जाहिर करण्यात आल़े जिल्ह्याचा 83़82 टक्के निकाल लागला असून 112 कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारे 13 हजार 614 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ 
नंदुरबार जिल्ह्यातील 112 कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणा:या 16 हजार 276 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले होत़े यात 9 हजार 187 मुले तर 7 हजार 89 मुली होत्या़ यापैकी 16 हजार 241 जणांनी परीक्षा दिली होती़ यात 9 हजार 171 मुली तर 7 हजार 70 मुली होत्या़ यापैकी 7 हजार 464 मुले आणि 6 हजार 150 मुली असे एकूण 13 हजार 614 विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत़ मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या यंदा कमी असली तरी मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86़99 तर 81़ 39 टक्के मुले परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत़ शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने बाजी मारली आह़े विज्ञान शाखेचा 93़11, कला 71़29 तर वाणिज्य शाखेचा 92़ 57 टक्के निकाल लागला आह़े  निकाल जाहिर झाल्यानंतर संकेतस्थळावरुन प्रिंट काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची रणरणत्या उन्हातही घराबाहेर पडले होत़े सायबर कॅफे आणि कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन खातरजमा करुन घेत होत़े अनेकांनी मोबाईल निकाल सेव करत इतरांना पाठवला होता़ 
 जिल्ह्यातील एकूण 23 परीक्षा केंद्रांवर मार्च महिन्यात झालेल्या  परीक्षांच्या निकालांबाबत प्रचंड उत्सुकता होती़ दुपारी निकाल जाहिर झाल्यानंतर विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात येत होता़ 

तालुकानिहाय निकालात यंदा नंदुरबार तालुक्याने बाजी मारल्याचे दिसून आले आह़े तालुक्यातून यंदा 4 हजार 797 विद्यार्थी परीक्षेला बसले होत़े यातून 2 हजार 374 मुले आणि 1 हजार 903 मुली असे 4 हजार 277 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत़ तालुक्याचा निकाल हा 89़ 16 टक्के लागला़
शहादा तालुक्यातून 4 हजार 240 विद्यार्थी परीक्षेला बसले होत़े यातील 1 हजार 59 मुले तर 1 हजार 424 मुली असे एकूण 3 हजार 283 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाल़े तालुक्याचा 77़43 टक्के निकाल लागला आह़े 
नवापूर तालुक्यात 2 हजार 983 विद्याथ्र्यानी बारावी परीक्षा दिली होती़ यातून 1 हजार 324 मुले  आणि 1 हजार 241 मुली असे एकूण 2 हजार 565 विद्यार्थी उत्तीर्ण झाल़े तालुक्याचा निकाल हा 85़ 99 टक्के लागला आह़े 
अक्कलकुवा तालुक्यातून 1 हजार 145 मुले तर 854 मुलींनी परीक्षा दिली होती़ यापैकी 882 मुले आणि 660 मुली असे 1 हजार 542 विद्यार्थी उत्तीर्ण झाल़े तालुक्याचा 77 टक्के निकाल लागला़ 
धडगाव तालुक्यातून 458 मुले आणि 422 मुली परीक्षेला बसले होत़े यातील 371 मुले आणि 355 मुली असे 726 विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल़े तालुक्याचा निकाल 82़50 टक्के आह़े तळोदा तालुक्यातून 1 हजार 342 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बारावीची परीक्षा दिली होती़ यातून 654 मुले आणि 567 मुली परीक्षा उत्तीर्ण झाल्या़ 1 हजार 221 विद्याथ्र्यानी बारावीची परीक्षा पास केल्याने तालुक्याची टक्केवारी 90़98 टक्के आह़े 

जयदीप नटावदकर प्रथम
जाहिर झालेल्या निकालात विज्ञान शाखेतून नंदुरबारातील एकलव्य विद्यालय व ज़ग़नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा जयदीप सुहास नटावदकर या विद्याथ्र्याने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आह़े त्याला विज्ञान शाखेतून 91़08 टक्के गुण आहेत़ त्याचा शाळा प्रशासनाकडून गौरव करण्यात आला़ 

विज्ञान शाखेतून 8 हजार 360 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती़ यात प्रथमश्रेणीत 3 हजार 388, द्वितीय श्रेणी 3 हजार 903 तर पास श्रेणीत 165 असे एकूण 7 हजार 764 विद्यार्थी उत्तीर्ण झाल़े कला शाखेतून 6 हजार 750 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली़ यात पास श्रेणीत 1 हजार 497, द्वितीय श्रेणीत 3 हजार 141 तर पास श्रेणीत 147 असे एकूण 4 हजार 812 विद्यार्थी उत्तीर्ण झाल़े वाणिज्य शाखेतून 908 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती़ यात प्रथम श्रेणीत 418, द्वितीय श्रेणीत 325 तर पास श्रेणीत 21 असे 836 विद्यार्थी उत्तीर्ण झाल़े 

Web Title: 83 percent results of the examination in the XII examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.