लॅाकडाऊनच्या काळात आढळले ८४ एड्‌स रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:57 AM2020-12-01T11:57:15+5:302020-12-01T11:57:23+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   जिल्ह्यात एड्‌स बाधीतांची संख्या वाढत आहे. लॅाकडाऊनच्या काळात देखील जिल्ह्यात ८४ रुग्ण आढळले. ...

84 AIDS patients were found during the lockdown | लॅाकडाऊनच्या काळात आढळले ८४ एड्‌स रुग्ण

लॅाकडाऊनच्या काळात आढळले ८४ एड्‌स रुग्ण

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :   जिल्ह्यात एड्‌स बाधीतांची संख्या वाढत आहे. लॅाकडाऊनच्या काळात देखील जिल्ह्यात ८४ रुग्ण आढळले. जिल्ह्यात एड्‌स बाधीतांच्या कोरोना चाचणीसाठी देखील नियोजन करण्याची गरज आहे. दरम्यान, एड्‌स सप्ताहानिमित्त एड्‌स प्रतिबंधक व नियंत्रण पथकामार्फत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
कोरोना काळात देखील अर्थात एप्रिल ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात एड्‌स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाचे काम सुरू होते. सामान्य रुग्णांची तपासणी करण्याचे काम करून त्यातून एड्‌स बाधीतांना डिटेक्ट केले जात      होते. जिल्हा रुग्णालयातील    समुपदेशन केंद्र आणि उपचार केंद्रात कोरोना काळात देखील काम सुरू होते. याच काळात जिल्ह्यात विविध तपासणींमध्ये ८४ एड्‌स बाधीत आढळून आले आहेत.
अशी झाली तपासणी
कोरोना काळात जिल्ह्यात २५ हजार ३०० जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील ७८ जण एड्‌स बाधीत आढळून आले. तर २३ हजार ६६४ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली असता त्यातील सहा जण पॅाझिटिव्ह आढळून आले. दोन्ही मिळून ४८ हजार ९६४ जणांची तपासणी करण्यात आली   होती. 
कोरोना काळात एड्‌स बाधीतांच्या औषधोपचार आणि समुपदेशनात खंड पडू नये यासाठी एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने विशेष काळजी घेतली. रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध करून देण्यात आली. 
कोरोना तपासणी
एड्‌स बाधीतांची कोरोना तपासणी करण्याचे देखील नियोनज करण्यात आले आहे. परंतु अनेक रुग्ण यासाठी घाबरत असल्याचे चित्र आहे. ओळख पटू नये हे त्यामागचे कारण  असल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 
दरम्यान, एड्‌स सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

यंदा ॲानलाईन
  यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एड्‌स सप्ताहाचे सर्व उपक्रम जागतीक एकता, सामायीक जबाबदारी हे ब्रिद वाक्य समोर ठेऊन राबविण्यात येत आहेत. 
 जनजागृतीचे सर्व कार्यक्रम हे ॲानलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. तसे नियोजन देखील करण्यात आले आहे. 

Web Title: 84 AIDS patients were found during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.