सुसरी व दरा प्रकल्पात 90 टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:00 AM2017-09-14T10:00:44+5:302017-09-14T10:00:44+5:30

शहादा तालुका : भाद्रपदच्या पावसाने दिला दिलासा; मात्र पिकांचे नुकसान मोठे

90 percent water stock in the allotted and rated project | सुसरी व दरा प्रकल्पात 90 टक्के पाणीसाठा

सुसरी व दरा प्रकल्पात 90 टक्के पाणीसाठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यात सरासरी पावसाच्या 60 टक्के पाऊस झाला असून, श्रावणात श्रावणसरी दिसल्या नसल्या तरी भाद्रपद महिन्यात मात्र पावसाने जोर धरल्याने सुसरी व दरा प्रकल्प 90 टक्के भरले आहेत.
शहादा तालुक्यात 720 मिली मीटर पाऊस झाला म्हणजे 100 टक्के पाऊस झाला अशी नोंद होते. मात्र गत वर्षार्पयत पावसाने 60 ते 65 टक्यांर्पयतच पाऊस झाला होता. त्यामुळे परिसरातील लहान व मध्यम प्रकल्पांसह नदी-नाले, पाटचा:या, तलाव कोरडे होते. परंतु यंदा पाऊस कसा असणार याचे भाकीत नसल्याने परिसरातील नदी-नाले व तलावातील खोली करणासह नांगरटी करण्याची संकल्पना जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी राबविली. या अभियानात  श्री श्री रवीशंकर यांचे अनुयायी किशोर पाटील, शहादा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तत्कालीन तहसीलदार नितीन गवळी, डॉ.उल्हास देवरे, नायब तहसीलदार वाय.डी. पाटील यांच्यासह सामाजिक संस्था व ग्रामस्थांच्या मतदीने कामे करण्यात आली.
पावसाळ्यातील श्रावण महिन्यात श्रावण सरी बसरल्या नसल्याने यंदा मात्र धरण व नदी नाल्यांमध्ये पाण्याची कमतरता दिसून येत होती. मात्र भाद्रपदात पावसाने जोर धरल्याने सुसरी व दरा प्रकल्पांसह नदी नाल्यांमध्ये 90 टक्के जलसाठा झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी 12 सप्टेंबर अखेर 225 मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. मात्र यंदा 465 मी.मी. पाऊस झाला असून, भाद्रपदात झालेल्या पावसाने ब्राrाणपुरी, जवखेडा, लोणखेडासह अनेक भागात केळी व ऊस पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले तर या पावसाचा सोयाबीन, कपाशी व पपई, ऊस पिकास लाभ होणार आहे. हा पाऊस रब्बी हंगामांसाठीही लाभदायक ठरणार आहे.
 

Web Title: 90 percent water stock in the allotted and rated project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.