नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये 96 हजार मेट्रीक टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:43 AM2017-11-27T11:43:16+5:302017-11-27T11:43:26+5:30

96 thousand metric tons of crushing in sugar factories in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये 96 हजार मेट्रीक टन गाळप

नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये 96 हजार मेट्रीक टन गाळप

Next
कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दोन सहकारी आणि एक खाजगी साखर कारखाना अशा तिन साखर कारखान्यांमध्ये गेल्या 15 दिवसात केवळ 96 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आह़े मजूरांच्या टोळ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने न आल्याने कारखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला आह़े शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने यंदा चार लाख 50 हजार मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्टय़ ठेवले आह़े त्यांच्याकडून शेतक:यांच्या ऊसाला दोन हजार 400 रूपये प्रती टन दर देण्यात आला आह़े गेल्या 20 दिवसांपासून कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरूवात झाली आह़े 20 दिवस उलटूनही मात्र कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने होत नसल्याची माहिती देण्यात आली आह़े ऊसतोड कामगारांची संख्या अद्यापही कमी असल्याने कारखान्यार्पयत ऊस मर्यादित येत असल्याने गाळपावर परिणाम झाला आह़े येत्या चार दिवसात मजूरांची संख्या वाढणार असल्याने गाळपही पूर्ण क्षमतेने होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आह़े नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाचा शनिवारी 18 वा दिवस होता़ यंदा कारखान्याने चार लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्टय़ ठेवले आह़े मात्र उद्दीष्टाला मजूर टंचाईची बाधा निर्माण झाली असून गाळपावरही परिणाम झाला आह़े कारखान्यात दरवर्षी येणा:या मजूरांच्या संख्येत घट होऊन केवळ दुर्गम भागातील 500 मजूरांच्या टोळ्या याठिकाणी आल्या असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आह़े समशेरपूर ता़ नंदुरबार येथील अॅस्टोरिया शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज या खाजगी साखर कारखान्याने यंदा चार लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्टय़ घेतले होत़े यात त्यांनाही मजूर टंचाईचा सामना करावा लागत असल्याची माहिती देण्यात आली आह़े यंदा ऊस तोड कामगार परराज्यात स्थलांतरीत झाले आहेत़

Web Title: 96 thousand metric tons of crushing in sugar factories in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.