नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रात जिल्ह्यातील नैसर्गिक संकटांवर मंथन
By भूषण.विजय.रामराजे | Published: March 28, 2023 04:37 PM2023-03-28T16:37:50+5:302023-03-28T16:38:21+5:30
जिल्ह्यावर आगामी काळात येऊ घातलेल्या नैसर्गिक संकटांवर चर्चा करण्यात आली.
नंदुरबार : तालुक्यातील कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रात जागतिक हवामान दिनी नंदुरबार जिल्ह्यावर आगामी काळात येऊ घातलेल्या नैसर्गिक संकटांवर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान उपाययोजनांवर चर्चा करुन जिल्ह्यात नियुक्त केलेल्या ३०० आपदा मित्र स्वंयसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरास राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक म्हणुन पोलीस निरीक्षक मोहन परीहार, पोलीस उपनिरीक्षक, विजय गावंडे, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार सुनिल गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हा वसंत बोरसे आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणात जागतिक हवामान दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषि हवामान केंद्राचे कृषि हवामान विशेषज्ञ सचिन फड यांनी गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील सरासरी हवामानात बदल होत आहे. परिणामी उष्णतेची लाट, थंडीची लाट, गारपीट तसेच अवेळी पाऊस, कमी दिवसात जास्त पाऊस, चक्रीवादळ, विज पडण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान, जीवित आणि वित्तहानी होत आहे. लोकांनी तसेच आपदा मित्रांनी हवामानाचा अंदाज घेऊन तसेच विज पडण्याची पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी हवामानाचा अंदाज घेणाऱ्या तांत्रिक साधनांचा वापर वाढवल्यास वेळीच सावध होऊन येणाऱ्या आपत्तीस सामोरे जावून हानी कमी करता येईल असे सांगितले.