भरधाव रिक्षाच्या धडकेत पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू
By मनोज शेलार | Updated: March 22, 2024 17:58 IST2024-03-22T17:57:33+5:302024-03-22T17:58:48+5:30
नंदुरबार : भरधाव ॲपेरिक्षाने रस्त्याने जाणाऱ्या पाच वर्षीय बालिकेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना बुडीगव्हाण, ता. शहादा येथे गुरुवारी घडली. याबाबत शहादा ...

भरधाव रिक्षाच्या धडकेत पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू
नंदुरबार : भरधाव ॲपेरिक्षाने रस्त्याने जाणाऱ्या पाच वर्षीय बालिकेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना बुडीगव्हाण, ता. शहादा येथे गुरुवारी घडली. याबाबत शहादा पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी बिबीसिंग दैवत (पाच वर्षे) रा. बुडीगव्हाण, ता. शहादा असे मयत बालिकेचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, बुडीगव्हाण-म्हसावद रस्त्यावरून बालिका जात असताना भरधाव आलेल्या ॲपेरिक्षाने (क्रमांक एमएच १६ एएम ८३६०) बालिकेला पाठीमागून जबर धडक दिली. डोक्याला गंभीर मार लागून ती खाली पडली. जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत बिबीसिंग दशरथ दैवत यांनी फिर्याद दिल्याने रिक्षाचालक निहाल अहमद साहेबखा कुरेशी (३५) रा. फत्तेपूर, ता. शहादा याच्याविरुद्ध शहादा पोलिसांत अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार संजय ठाकूर करीत आहेत.