पक्ष कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही; खासदार श्रीकांत शिंदे यांची शहादा येथे भेट

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: January 11, 2024 02:03 PM2024-01-11T14:03:32+5:302024-01-11T14:03:43+5:30

खेतिया रस्त्यावरील श्रीविष्णुपुरम धाम येथे  संत  लोकेशानंद  महाराज यांचे श्रीमद् भागवत कथा सुरू आहे

A party is not one's private property; Meeting of MP Shrikant Shinde at Shahada | पक्ष कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही; खासदार श्रीकांत शिंदे यांची शहादा येथे भेट

पक्ष कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही; खासदार श्रीकांत शिंदे यांची शहादा येथे भेट

 नंदुरबार :  विधानसभा अध्यक्षांनी दिलेला कालचा निकाल हा लोकशाहीला अनुसरून आहे पक्ष ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार यांना घेऊन पक्ष पुढे जात असतो काल निकाल जाहीर झाल्यानंतर काही लोकांना त्याचा त्रास झाला आहे त्यामुळे ते निकालावर विरोधात प्रतिक्रिया देत आहे असे मत  खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले

येथील खेतिया रस्त्यावरील श्रीविष्णुपुरम धाम येथे  संत  लोकेशानंद  महाराज यांचे श्रीमद् भागवत कथा सुरू आहे या कथेसाठी व विशेष पूजेसाठी खासदार श्रीकांत शिंदे येथे आले असता त्यांनी पत्रकारांची वार्तालाप केला .यावेळी खासदार शिंदे म्हणाले  कालचा निकाल विरोधात गेला म्हणून उद्धव ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना हा निकाल झोंबला आहे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्या पर्यंत त्यांना केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच दिसतात गेल्या दीड वर्षापासून राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत त्यांच्या कामाने प्रभावीत होऊन राज्यातील अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत येत आहेत दररोज पक्षात प्रवेश होत आहेत हे केवळ चांगल्या कामाची पावती आहे आपल्याला कार्यकर्ते सोडून दुसरीकडे का जात आहेत    त्यावर आत्मचिंतन उद्धव ठाकरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी करावे येत्या काळामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते  पक्षात प्रवेश घेतील 2019 ला उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून इतर पक्षांसोबत जाण्याची घेतलेली भूमिका ही राज्यातील जनतेला पटलेली नाही यामुळे अनेकांनी त्यांची साथ सोडली आहे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे दुष्परिणाम उद्धव ठाकरे यांना आता सोसावे लागत आहे कार्यकर्ते सोडून जात आल्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे यामुळे त्यांना काही चांगले दिसत नाही असा थेट आरोप खासदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला

अध्यक्षांनी काल जाहीर केलेला निकाल  हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे तो शिवसैनिकांचा विजय आहे ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आहे त्यांना आता टीका करण्यासह दुसरा कुठलाही विचार मांडण्याचा काडीमात्र अधिकार नाही असा सल्ला त्यांनी ठाकरे गटाला दिला

दरम्यान खासदार शिंदे हेलिपॅड वर पोहोचल्यानंतर तेथे त्यांचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले  कुणाला वसावे धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पराडके कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: A party is not one's private property; Meeting of MP Shrikant Shinde at Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.