नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू

By मनोज शेलार | Published: July 17, 2024 06:33 PM2024-07-17T18:33:17+5:302024-07-17T18:33:43+5:30

याबाबत शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

A seven-month-old baby died after being swept away in the water of the canal | नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नंदुरबार : नाल्याच्या पाण्यातून दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याच्या हातातून सात महिन्याचे बाळ निसटल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुलाणे येथील मनोज विजय ठाकरे व मंजु मनोज ठाकरे हे दाम्पत्य सात महिण्याचा मुलासोबत मंगळवारी रात्री मोहिदा रस्त्याने जात होते. शासकीय गोडावूनलगतच्या नाल्यातून त्यांनी त्यांची दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा वेग अधिक असल्याने दुचाकीवरून दोघेजण खाली पडले. त्यावेळी मंजू ठाकरे यांच्या हातात असलेले बाळ खाली पडल्याने ते पाण्यात वाहून गेले. सकाळी ते ५०० फुटावर आढळले. त्याला दवाखान्यात दाखल करून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, ही माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांचे स्विय सहायक हेमराज पवार, मोहिदा ग्रामपंचायत गट नेते भाऊभाई पाटील,जयप्रकाश पाटील यांनी ठाकरे दाम्पत्याला मदत केली.
 

Web Title: A seven-month-old baby died after being swept away in the water of the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू