ऊसतोडसाठी मजूर घेऊन जाणारा ट्रक अन् ट्रॅव्हल्स बसची धडक; ४ मजूर ठार, १४ जखमी
By मनोज शेलार | Published: September 29, 2022 07:46 PM2022-09-29T19:46:28+5:302022-09-29T19:48:21+5:30
शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
नंदुरबार : ऊसतोडसाठी मजूर घेऊन जाणारा ट्रक व खाजगी लक्झरी बसमध्ये झालेल्या धडकेत चारजण ठार तर १४ जण जखमी झाल्याची घटना शहादा वळण रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातात प्रमिला किशोर भिल (२८), सुनिता अशोक पाडवी (४५), करण अशोक पाडवी (२६) तिन्ही राहणार पाडळदा व रमणबाई आखीराज भिल (५०) रा. अलखेड असे चार मजूर मयत झाले आहेत. जिल्ह्यातील मजूर सध्या परजिल्हा आणि परराज्यात मजुरीसाठी जात आहेत. त्यासाठी ठेकेदारांची वाहने त्यांना घेण्यासाठी येत आहेत.
नेहमीप्रमाणे शहादा तालुक्यातील मजूर पंढरपूर साखर कारखाना आणि गुजरातमधील जुनागड परिसरात दोन वाहनातून ४५ पेक्षा अधीक मजूर जात होते. शहादा वळण रस्त्यावर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात ट्रकमधील चार मजूर जागीच ठार झाले तर १४ जण जखमी झाले. चार गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"