फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने युवतीची आत्महत्या
By भूषण.विजय.रामराजे | Updated: July 19, 2023 19:45 IST2023-07-19T19:45:35+5:302023-07-19T19:45:53+5:30
राहुल हा वारंवार रजिया हिच्यासोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा छळ करीत होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली.

फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने युवतीची आत्महत्या
नंदुरबार : सोबत असलेला फोटो ऑनलाइन व्हायरल करण्याची धमकी दिल्याने १७ वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरुणीने १५ जुलैला सकाळी ८ वाजताच्या सुमारस राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. तिला गेल्या काही माहिन्यांपासून राहुल अमर सिंग वळवी (२१) रा. वेली ता. अक्कलकुवा येथील युवक त्रास देत असल्याचे समोर आले होते. राहुल हा वारंवार संबंधित तरुणीला सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा छळ करत होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती.
याप्रकरणी तरुणीच्या आईने मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राहुल अमरसिंग वळवी (२१) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश माळी करीत आहेत.