आ देखे जरा, किसमे कितना है दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:08 PM2020-04-27T14:08:40+5:302020-04-27T14:08:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतीतील यांत्रिकीकरणामुळे ‘सालदार’की आता कालबाह्य ठरली आहे. परंतु पूर्वी अक्षय तृतीयेला सालदार ठरवितांना जी ...

Aa dekhe zara, kisme kitna hai dum | आ देखे जरा, किसमे कितना है दम

आ देखे जरा, किसमे कितना है दम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतीतील यांत्रिकीकरणामुळे ‘सालदार’की आता कालबाह्य ठरली आहे. परंतु पूर्वी अक्षय तृतीयेला सालदार ठरवितांना जी पद्धत व परंपरा होती ती येथील माळीवाड्यात आजही कायम आहे. ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम...’ म्हणत जो जास्त वजनाचा दगड उचलेल त्याला सालदार ठेवले जात होते आता केवळ औपचारिकता म्हणून दगड उचलून ही परंपरा पाळली जात आहे. यंदा लॉकडाऊन, संचारबंदी व कोरोनाची दहशत यामुळे फारसा उत्साह दिसून आला नाही.
खान्देशात पूर्वी अक्षय तृतीयेला सालदारांचे नवीन वर्ष सुरू होत होते. याच वेळपासून नवीन सालदाराचीही नेमणूक केली जात होती. पूर्वी शेतीचे यांत्रिकीकरण नव्हते, त्यामुळे केवळ मणुष्यबळावरच शेतीची कामे अवलंबून राहत होती. त्यामुळे सालदारांना मोठी मागणी राहत होती. वर्षाचे ठराविक पैसे देवून, धान्य व कपडे देवून त्याची राहण्याची व्यवस्था शेतकऱ्याकडे करावी लागत होती. सालदार ठरवितांना अनेक प्रथा व परंपरा होत्या. त्यातीलच एक नंदुरबारातील माळीवाड्यातील ‘दगड उचलण्याची’ प्रथा होय. माळीवाड्यातील सार्वजनिक चौकात अक्षय तृतीयेला पूर्वी पहाटेपासूनच ही स्पर्धा सुरू होत होती. त्यासाठी पंचक्रोशीतील अनेकजण उपस्थित राहत होते. एक क्विंटलपासून पाच क्विंटलपर्यंत वजनाचा दगड एका दमात उचलून तो खांद्यावर ठेवण्याची ही स्पर्धा राहत होती. जो व्यक्ती एका दमात दगड उचलत होता. त्याला सालदार म्हणून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांमध्येही स्पर्धा लागत होती. अशावेळी जास्तीत जास्त पैसा जो देईल त्या शेतकºयाला असे सालदार पसंती देत होते.
आता ही परंपरा कालबाह्य ठरली असली तरी त्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी अक्षय तृतीयेला ही स्पर्धा घेतली जाते. आता सालदार न ठेवता एका दमात जो दगड उचलेल त्याला रोख रक्कम म्हणून बक्षीस दिले जाते.
रविवारी देखील सकाळपासूनच याची उत्सूसता होती. परंतु संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिगचे नियम यामुळे गर्दीवर यंदा नियंत्रण राहिले. जास्तीत जास्त एक क्विंटलपर्यंत दगड उचलण्यात यावेळी यश आले. माणिक माळी यांनी दगड उचलणाºया युवकांना प्रोत्साहन दिले.

Web Title: Aa dekhe zara, kisme kitna hai dum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.