सुशिक्षीत बेरोजगारांच्या नोंदणीत आता आधार क्रमांक सक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:48 PM2020-07-26T12:48:45+5:302020-07-26T12:49:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आॅनलाइन नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी तात्काळ आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद करून प्रोफाईल ...

Aadhaar number is now mandatory in the registration of educated unemployed | सुशिक्षीत बेरोजगारांच्या नोंदणीत आता आधार क्रमांक सक्तीचा

सुशिक्षीत बेरोजगारांच्या नोंदणीत आता आधार क्रमांक सक्तीचा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आॅनलाइन नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी तात्काळ आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद करून प्रोफाईल अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी या संकेतस्थळावर सुरू आहे. उमेदवारांनी आॅनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांना यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने संकेतस्थळावर उपलब्ध सुविधा आणि माहितीचा लाभ घेता येतो.
उमेदवारांनी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक संकेतस्थळावर आपल्या प्रोफाईलमध्ये भरावा. प्रोफाईल अद्ययावत न केल्यास नाव नोंदणी ३१ आॅगस्ट अखेर रद्द होईल.
अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात, नंदुरबार येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Aadhaar number is now mandatory in the registration of educated unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.