उमर्दे येथील शेतात आमिर खान यांनी ग्रामस्थांसोबत घेतला जेवणाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:38 PM2018-05-14T12:38:49+5:302018-05-14T12:38:49+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 14 : नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथे श्रमदानात सहभाग घेत पानी फाउंडेशनच्या कामाची पाहणी अभिनेते आमिर खान यांच्याकडून करण्यात आली़ या वेळी त्यांनी शेतात उघडय़ावरच ग्रामस्थांसोबत दुपारच्या जेवणाचा आनंद घेतला़ त्यांच्यासाठी ग्रामस्थांकडून कढी, खिचडी व मक्याच्या भाकरीची व्यवस्था करण्यात आली होती़ या वेळी सोबत पत्नी किरण राव व अभिनेता रणवीर कपूरसुध्दा होत़े सोमवारी अभिनेते आमिर खान यांनी नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले व उमर्दे गावांना भेट देऊन या ठिकाणी श्रमदानात सहभाग घेतला तसेच पानी फाऊंडेशनच्या कार्याचे चित्रीकरणदेखील यावेळी करण्यात आल़े सकाळी दहिंदुले येथे भेट दिल्यानंतर साडेअकराच्या सुमारास आमिर खान व सहकारी उमर्दे येथे दाखल झाल़े या वेळी त्यांनी श्रमदान करुन ग्रामस्थांना संबोधीत केल़े पाणीदार गावांसाठी सर्वानी मिळून श्रमदान करण्याचेही आवाहन त्यांनी या वेळी उपस्थितांना केल़े