आष्टे जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम : दर महिन्याला केले जाते विद्याथ्र्याचे वजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:33 PM2018-01-07T12:33:53+5:302018-01-07T12:34:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील आष्टे (मोड) जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने पुढाकार घेत, दर दिवशी सकस अन्न देण्यासोबतच दर महिन्याला विद्याथ्र्याचे वजन करून आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम सुरू केला आह़े यातून विद्याथ्र्याचे आरोग्य चांगले राहून प्रकृती सुदृढ होत असल्याचे निदर्शनास आले आह़े
ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण रूजवण्यासाठी शासन पालकांची सातत्याने जनजागृती करत आह़े यातून एकही विद्यार्थी सुटू नये असा शासनाचा आग्रह आह़े जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षक यांच्या माध्यमातून हा शिक्षणाचा जागर करण्यात येत आह़े यालाच पुढे आरोग्याची जोड देण्याचे कार्य आष्टे (मोड) जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक करत आहेत़ प्रत्येक विद्यार्थी हा केवळ शैक्षणिकदृष्टय़ाच नव्हे तर प्रकृतीने सुदृढ करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आह़े यासाठी शिक्षकांनी वर्गणी करून विविध साधने खरेदी करून आणली आहेत़ तीन शिक्षक, एक शिक्षिका आणि मुख्याध्यापक अशा पाच लोकांकडून चालवल्या जाणा:या या शाळेत विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यापूर्वी वजन करण्यासाठी शिक्षकांनी स्वखर्चाने इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणला होता़ या काटय़ासोबत गॅस शेगडी, गॅस कनेक्शन यासाठी लागणारा अवांतर खर्च, चांगल्या दर्जाचा पोषण आहार याची गरज होती़ हा खर्चही शिक्षकांनी वर्गणी करून दिला आह़े शिक्षकांनी केलेल्या या कार्याचे पालकांसह मोड आणि आष्टे गावातून कौतूक करण्यात येत आह़े दर महिन्याला वजन करण्यात आल्यानंतर वजनाचा तपशील शिक्षकांकडून बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात दिला जातो़ हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मागील महिने आणि चालू महिने यावरून विद्याथ्र्याच्या प्रकृतीबद्दल योग्य त्या सूचना करण्यात येत आह़े गेल्या सहा महिन्यात नियमानुसार देण्यात येणा:या पोषण आहारामुळे मुलांच्या आजारी पडण्याचे प्रमाण हे 70 टक्के कमी झाल्याचे सांगण्यात आले आह़े तळोदा तालुक्यातील आष्टे जिल्हा परिषद शाळेत या प्रकारे नित्याने उपचार करण्याचा एकमेव उपक्रम राबवण्यात येतो़ या तपासणीला शासकीय योजनेचीही जोड आह़े एखाद्या विद्याथ्र्याला जन्मजात ह्रदयरोग, स्नायूंचे आजार, हाडांचे आजार असल्याचे निष्पन्न झाल्यावर महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची तरतूद आह़े अद्याप एकाही विद्याथ्र्याला याची गरज पडली नसली तरी, उपजिल्हा रूग्णालय प्रशासन याबाबत सजग आह़े