आषाढी एकादशी : यात्रेसाठी दररोज एक जादा बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:10 PM2018-07-15T12:10:05+5:302018-07-15T12:10:11+5:30

Aashadi Ekadashi: An over bus for the yatra every day | आषाढी एकादशी : यात्रेसाठी दररोज एक जादा बस

आषाढी एकादशी : यात्रेसाठी दररोज एक जादा बस

Next

नंदुरबार : 23 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रेला जाण्यासाठी विविध आगारांकडून 18 ते 22 जुलै दरम्यान, रोज एक ‘पंढरपूर स्पेशल’ एसटी बस रवाना करण्यात येणार आह़े नेहमीच्या बस व्यतिरिक्त अजून एक जादा बस सोडण्यात येणार असल्याने भाविकांची पंढरपूर वारी सुखद होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आह़े 
जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, शहादा व नवापूर आगाराकडून 18 ते 22 जुलै दरम्यान, दररोज विशेष पंढरपूर स्पेशन एक जादा बस सोडण्यात येणार आह़े सदर बस ही धुळे, नगरमार्गे, करमाळा, टेंभूर्णी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आह़े 
प्रवाशांच्या मागणीनुसार व समाधानकारक प्रवासी संख्येनुसार अजून अतिरिक्त बसेस सोडण्याचे नियोजनही एसटी महामंडळाकडून करण्यात आले आह़े मागील आषाढी यात्रेचा इतिहास बघता जिल्ह्यातून फारसे यात्रेकरु जात नसल्याने येथील एसटी महामंडळाची पंढरपूर यात्रेचे उत्पन्न तोटय़ातच असल्याचे दिसून येत आह़े 
अक्कलकुवा आगाराला मागील पंढरपूर यात्रेसाठी 2 लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होत़े यंदा ते वाढून 2 लाख  10 हजार इतके झाले आह़े मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसचे भारमान अत्यंत कमी म्हणजे 49़62 टक्के इतके राहिले होत़े दिलेल्या उद्दीष्टापैकी निम्मे उद्दीष्टसुध्दा आगारास पूर्ण करता आले नव्हत़े 
मागील वर्षी एकूण 28 बसफे:याव्दारे 11 हजार 570 किमीचा प्रवास करण्यात आला होता़ 
शहादा आगारातर्फे प्रत्येकी एक जादा गाडीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आह़े त्याच प्रमाणे एखाद्या गावातून एसटी बसची मागणी असेल आणि समाधानकारक प्रवासी संख्या असेल तर, थेट गावामध्ये एसटी बस          देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली़ 
नवापूर आगाराला यंदा 2 लाख 15 हजार रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले आह़े मागील वर्षी 2 लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होत़े 18 ते 22 जुलै दरम्यान, रोज एक बस सोडण्यात येणार असली तरी, प्रवासी संख्येनुसार ती बस पंढरपूरच्या दिशेने रवाना करण्यात येणार आह़े त्यामुळे वेळेची निश्चिती करण्यात आली नसल्याचे आगाराकडून सांगण्यात आले आह़े 
थेट गावासाठी मिळणार बस
प्रवासी संख्या समाधानकारक असल्यास मागणीनुसार थेट गावासाठी बस  देण्यात येणार असल्याचे नंदुरबार आगाराकडून सांगण्यात आले आह़े मागील दोन वर्षापासून नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ या गावासाठी स्वतंत्र बस देण्यात येत आह़े यंदाही गावातील यात्रेकरुंनी मागणी केल्यास थेट गावापासून पंढरपूर बस उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े
भारमान वाढीसाठी प्रयत्न
विविध आगार प्रशासनाकडून यात्रेदरम्यान, एसटी बसेसचे भारमान वाढावे म्हणून प्रयत्न करण्यात येत आह़े अनेक आगारांना दिलेले उद्दीष्ट पूर्ण करताना कसरत करावी लागत आह़े यात्रेदरम्यान, एसटीने आपल्या भाडेदरात कपात करावी असे मत अनेक यात्रेकरुंकडून व्यक्त करण्यात येत आह़े चार दिवस हा यात्रोत्सव सुरु राहणार असल्याने जास्तीत जास्त  प्रवासी एसटीकडे वळावे यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत़
 

Web Title: Aashadi Ekadashi: An over bus for the yatra every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.