आषाढीनिमित्त अभंगवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:36 PM2019-07-14T12:36:10+5:302019-07-14T12:36:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आषाढी एकादशीनिमित्त नादrा ग्रुपतर्फे ‘कानडा राजा पंढरीचा’ हा शास्त्रीय रागावर आधारित अभंगवाणीचा कार्यक्रम घेण्यात ...

Abhanga Nimitikam Abhangaanimi | आषाढीनिमित्त अभंगवाणी

आषाढीनिमित्त अभंगवाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : आषाढी एकादशीनिमित्त नादrा ग्रुपतर्फे ‘कानडा राजा पंढरीचा’ हा शास्त्रीय रागावर आधारित अभंगवाणीचा कार्यक्रम घेण्यात         आला.
शहादा येथील डोंगरगाव रोडवरील अन्नपूर्णा लॉन येथे आषाढी एकादशी निमित्त शहादा तालुका पत्रकार संघ व संस्था आयोजित ‘ नादब्रrा’ ग्रुप संचलित ‘कानडा राजा पंढरीचा’ हा शास्त्रीय रागावर आधारित अभंगवाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार उदेसिंग पाडवी,  नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, ईश्वर पाटील, अनिल भामरे, अतुल जायसवाल, आर.एम. पाटील, किशोर पाटील, राम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांना शास्त्रीय रागावर आधारित अभंगवाणीने मंत्रमुग्ध केले. त्यात  ‘तीर्थ विठ्ठल- देह विठ्ठल..’, ‘विठू माऊली ही माऊली जगाची..’, ‘जैसी गंगा वाहे-तैसे जाते मन..’ या अभंगवाणीसह सर्वात जास्त   ‘कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला..’ या अभंगवाणीने  सा:यांनाच भुरळ घातली. ही अभंगवाणी प्रा.डॉ.रवींद्र मराठे यांनी सादर केली होती. प्रत्येक अभंगवाणीचा अर्थ विष्णू जोंधळे यांनी कार्यक्रमात समजावून सांगितले. अनेक अभंगात स्वर, राग, आलापांनी  सारा परिसर पंढरीमय झाला होता. अभंगवाणी छोटूभाई पाटील, रामकृष्ण लांडे, चंद्रकांत टेंभेकर, प्रवीण मराठे, दगाभाई महाजन, मधुकर शिंपी, मोहन शिंपी आदींनी सादर केले. नादब्रrा ग्रुप हा दरवर्षी शास्त्रीय अभंगवाणीचा कार्यक्रम करीत असतो. यंदाचे 15 वे वर्ष पूर्ण झाले आहे.
 

Web Title: Abhanga Nimitikam Abhangaanimi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.