लोक अदालतीत 231 प्रकरणे मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:38 PM2018-07-17T12:38:23+5:302018-07-17T12:38:28+5:30
नंदुरबार : जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत सुमारे सहा हजार दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात येऊन 231 प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यातून सव्वा कोटी रुपयांची रक्कम ही वसूल करण्यात आली आह़े
जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय वाघवसे, सचिव सतीश मलिये, जिल्हा न्यायाधीश- वर्ग 1 आऱएस़गुप्ता, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश गुलाबराव पाटील, कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश ज़ेसी़ गुप्ता यांच्या उपस्थितीत ही लोकअदालत जिल्हा न्यायालयात घेण्यात आली होती़ यावेळी गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली़ यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातून दावेदार उपस्थित होत़े खाजगी पतपुरवठा कंपन्यांसह इतर प्रकरणांवर दीर्घ काळ चर्चा होऊन त्यात समेट करण्यात आला़ येत्या काळातही विधी व सेवा प्राधिकरणकडून हे उपक्रम राबवले जाणार आहेत़ पहिल्या टप्प्यात निकाली निघालेल्या 113 प्रकरणांतून 36 लाख 92 हजार 404 रूपयांची वसुली करण्यात विधी प्राधिकरणाला यश आले आह़े बँकांकडून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या जमिनीतारण, वैयक्तिक, व्यवसाय आणि इतर औद्योगिक स्वरूपाच्या कर्जाची मांडणी करण्यात आली आली़ यातील बहुतांश प्रकरणांवर चर्चा झाल्याने येत्या काळात त्यांच्यात समेट घडण्याची शक्यता वर्तवली जात आह़े
निकाली निघालेल्या प्रकरणांनंतरही अद्याप 5 हजार 256 प्रकरणे प्रलंबित आहेत़ या प्रलंबित प्रकरणांवर येत्या सप्टेंबरमध्ये होणा:या लोकअदालतीत चर्चा होण्याची शक्यता आह़े विधी व सेवा प्राधिकरणकडून सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यातील नागरिकांकडून या शिबिरांमध्ये येण्याची तयारी दर्शवण्यात आली होती़ त्यानुसार हे कामकाज करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े राष्ट्रीय लोक अदालतीच्या पहिल्या टप्प्यात बँकेशी संबंधित थकीत कर्जाची 2 हजार 459 प्रकरणे मांडण्यात आली होती़ यातून 17 प्रकरणांमध्ये दावेदार बँक आणि थकबाकीदार यांच्यात समझोता होऊन 33 लाख 64 हजार 521 रूपयांची वसुली झाली़ वीज कंपनीतर्फे विजबिलांची 1 हजार 143 प्रकरणे मांडण्यात आली़ यात 19 प्रकरणे निकाली निघाली यातून 1 लाख 35 हजार 679 रूपयांची वसुली झाली़ विविध ग्रामपंचायती, नगरपालिका क्षेत्रातील थकीत पाणीपट्टीची 565 प्रकरणांवर चर्चा झाली़ यातून 48 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन 92 हजार 731 रुपयांची वसुली झाली़ इतर फौजदारी, कौटूंबिक आणि दिवाणी स्वरूपाची 1 हजार 202 प्रकरणे मांडण्यात आली होती़ यावर चर्चा झाल्यानंतर त्यातील 29 प्रकरणांवर समझोता होऊनन त्यातून 99 हजार 473 रूपयांची वसुली करण्यात आली़ यावेळी दावेदार, थकबाकीदार यांच्यासह कौटूंबिक आणि फौजदारी प्रकरणातील वादी आणि प्रतीवादी यांनी आपपल्या बाजू विधी प्राधिकरणासमोर मांडल्याने ही प्रकरणी मार्गी लागली आहेत़