मोहिदे येथील वसतिगृहातील विद्याथ्र्याचे बससेवेअभावी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:51 PM2018-03-18T12:51:07+5:302018-03-18T12:51:07+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 18 : मोहिदेतर्फे शहादे येथील शासकीय आदिवासी मुलां-मुलींच्या वसतिगृहापासून एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.
याबाबत फेडरेशनच्या पदाधिका:यांनी शहादा आगाराला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहिदे त.श. येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह हे शहादा शहरापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा जास्त असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींना महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी मोहिदा फाटय़ार्पयत पायी यावे लागते. याठिकाणी विद्याथ्र्याना थांबण्यासाठी शेड नसल्याने उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यातच बसेस वेळेवर येत नाहीत, कधी कधी थांबत नाही त्यामुळे विद्याथ्र्याचे हाल होतात. त्यामुळे वसतिगृहातील एक हजार 200 विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृहापासून बससेवा सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा सचिव सुनिल सुळे, सल्लागार अॅड.चंपालाल भंडारी, तालुका अध्यक्ष नितीन तडवी, खजिनदार रामसिंग पावरा, जिल्हा संघटक भीमा ठाकरे व विद्याथ्र्यानी हे निवेदन दिले.