बसेस अभावी विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:03 PM2019-10-05T12:03:17+5:302019-10-05T12:03:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील गावांना तळोदा बसस्थानकातून सकाळी सुटणा:या  बसेसला विलंब होत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वेळेत ...

Academic loss of school due to lack of buses | बसेस अभावी विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान

बसेस अभावी विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील गावांना तळोदा बसस्थानकातून सकाळी सुटणा:या  बसेसला विलंब होत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वेळेत पोहचत नसल्याने त्यांचे वर्षभरापासून शैक्षणिक नुकसान होत आहे. 
याबाबत तळोदा बसस्थानकाच्या प्रमुखास विद्याथ्र्यानी निवेदन देऊनही बसच्या वेळेत बदल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्याथ्र्यानी दिला आहे. दरम्यान याबाबत बसस्थानकातील प्रमुखास विचारले असता अक्कलकुवा आगाराकडे निवेदन पाठविले असल्याचे सांगण्यात आले.
तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरातील गोपाळपूर, नवागाव व चिनोदा या गावांमधील साधारण 70 ते 80 मुले व मुली शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तळोद्याला येत असतात. या विद्याथ्र्याना अपडाऊन करण्यासाठी अक्कलकुवा आगाराकडून तळोद्याहून सकाळी सव्वासात वाजता बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करून सर्व शाळा, महाविद्यालयीन मुले तळोद्याला येत असतात, असे असले तरी या बसच्या वेळापत्रकामुळे विद्याथ्र्याना अडचणीचे ठरत आहे. कारण ही बस तळोद्याहून साडेसहा, पावणेसात वाजेला सुटून ती साधारण साडेसातला पोहचत असते. 
साहजिकच यामुळे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचू शकत नाही. शाळा, महाविद्यालय भरण्याची वेळ, सव्वासात, साडेसात वाजेला असते. त्यामुळे विद्याथ्र्याचा पहिला तास कामस्वरूपी वाया जात असतो. त्यातही शालेय विद्याथ्र्याचा पहिला तास गणित अथवा इंग्रजीचा असतो. बसमुळे वेळेवर पोहोतच नसल्याने या कठीण विषयांचे नुकसान होत असल्याचे विद्यार्थी सांगतात. रस्त्याच्या दुरवस्थेने बसला रांझणीर्पयत पोहोचणे तेथून पुन्हा तळोद्याला येण्यात बराच वेळ लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तळोदा-रांझणी या सकाळी सुटणा:या बसच्या वेळेत बदल करावा, अशी विद्याथ्र्याची मागणी आहे. तसे निवेदनही महिनाभरापूर्वी तळोदा बसस्थानकाच्या प्रमुखांना दिले आहे. याप्रकरणी तातडीने दखल घेऊन वेळेत बदल करण्याची आवश्यकता असतांना विद्याथ्र्याच्या निवेदनास केराची टोपली दाखवत उदासिन धोरण घेतल्याचा विद्याथ्र्याचा आरोप आहे. वास्तविक बसच्या वेळेत थोडासा बदल करण्याची मागणी आहे. ही बस सकाळी सहा वाजेला तळोद्याूहन रांझणीस साडेसहा तेथून सातवाजेला तळोद्यात पोहोचली तर विद्याथ्र्याना सकाळच्या तासिका सुरळीत सापडतील. मात्र अक्कलकुवा आगारप्रमुख एवढी तसदी घ्यायलादेखील तयार नसल्याने या प्रशासनाच्या हेकेखोर प्रवृत्तीबाबत विद्याथ्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनींसाठी एस.टी महामंडळाने मानव विकास मिशन अंतर्गत स्वतंत्र बस असतांना या बसमध्ये इतर प्रवाशांना बसवून विद्यार्थिनींना अक्षरश: कोंबून        आणले जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. त्याचबरोबर हे विद्यार्थी वेळेवर पोहोचत नसल्यामुळे त्यांना शिक्षकांचा रोषदेखील पत्करावा लागत असल्याचे विद्यार्थी म्हणात. या मार्गावरील विद्याथ्र्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन तातडीने बसच्या वेळेस बदल करावा, अशी मागणी विद्याथ्र्यानी केली आहे. 

Web Title: Academic loss of school due to lack of buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.