राज्यमार्गावरील सोमावल ते अक्कलकुवा दरम्यान अपघातांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:13 PM2018-03-31T12:13:53+5:302018-03-31T12:13:53+5:30

The accident occurred between Somawal and Akkalkuwa on the state road | राज्यमार्गावरील सोमावल ते अक्कलकुवा दरम्यान अपघातांचे सत्र सुरूच

राज्यमार्गावरील सोमावल ते अक्कलकुवा दरम्यान अपघातांचे सत्र सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाच्या बॅग घेऊन ट्रक (क्रमांक जीजे27  टी-9711) हैद्राबादकडे निघाला होता. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यमार्गावरील मोदलपाडा ते सोमावल गावादरम्यान भरधाव असणारा हा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये चालक व सहचालक असे दोन जण होते. समोरून येणा:या कंटेनरने साईड न देता कट मारल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत उलटला, अशी माहिती सहचलकाने दिली. अपघाताची भीषणता एवढी होती की, हा ट्रक पूर्णपणे उलटून चारही चाके वरच्या दिशेला झाली. चालक व सहचालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकले. इतर वाहन चालकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात चालक व सहचालक यांना कोणतीही  गंभीर दुखापत झाली नाही. इर्शाद व मोहंमद सैबाझ (दोघे रा.अहमदाबाद, गुजरात) अशू त्यांची नावे   असल्याचे सांगण्यात आले. त्यांना या अपघातात किरकोळ जखमा झाल्या आहेत. सकाळी मोदलपाडा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी किसन वळवी, गुलाबसिंग वसावे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रकची पाहणी केली.  पुढील पोलीस कार्यवाही केली.
अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर तळोदा ते खापर दरम्यान वर्षभरापासून भरधाव ट्रक उलटण्याचे सत्र सुरू आहे. मात्र संबंधित विभागाने पूर्णपणे बघ्याची भूमिका घेतली आहे. दर दिवसाआड राज्यमार्गावरील तळोदा ते खापरदरम्यान अपघात होत आहेत.   
2 फेब्रुवारी रोजी जामली फाटय़ाजवळील वळणावर खताचा ट्रक उलटला होता तर 9 मार्च रोजी याचठिकाणी पपईने भरलेला ट्रक उलटल्याने डिङोलची टाकी फुटून ट्रक पेटला होता. अशाप्रकारे दर महिना-पंधरा दिवसांनी तळोदा ते खापर दरम्यान अपघाताचे सत्र नेहमीचे झाले आहे. 
बेशिस्त वाहतूक व अनियंत्रित वेग, ओव्हरलोड भरलेली वाहने,          अप्रशिक्षित व मद्यपी चालक, परिवहन व पोलीस वाहतूक शाखेचे याकडे असणारे दुर्लक्ष ही या अपघातांच्या मालिकेमागील कारणे असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरापासून ट्रक उलटण्याचे सुरू असणारे सत्र थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत   नाही.
 

Web Title: The accident occurred between Somawal and Akkalkuwa on the state road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.