चांदसैली घाटात कठडय़ांच्या दुरावस्थेमुळे अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 03:07 PM2019-01-17T15:07:53+5:302019-01-17T15:08:01+5:30

चांदसैली : तीव्र उतारामुळे अपघाताची भिती, उपाय योजना आवश्यक

Accidental Risk of Accidental Deaths in Chandsalee Ghat Due to Accidental Risk | चांदसैली घाटात कठडय़ांच्या दुरावस्थेमुळे अपघाताचा धोका

चांदसैली घाटात कठडय़ांच्या दुरावस्थेमुळे अपघाताचा धोका

Next

कोठार : तळोदा व धडगावला जोडणा:या चांदसैली घाटात वर्षभरापासून अनेक ठिकाणी संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. कठडय़ांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक घाट म्हणून चांदसैलीचा घाट परीचित आहे. अरुंद रस्ता व नागमोळी वळणे यामुळे या घाटात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. घाटात वाहनांचा अपघात होऊन वाहन खोल दरीत कोसळू नये यासाठी ठिकठिकाणी संरक्षक कठडे बसविण्यात आली आहे. परंतु वर्षभरापासून चांदसैली घाटात अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या या संरक्षक कठडय़ांची दुरावस्था झाली आहे.अनेक ठिकाणचे संरक्षक कठडे हे उभ्या पोलवरून निखळून खाली पडलेले आहेत़ तर काही ठिकाणी नुसतेच कठडय़ांचे लहान पोलच उभे असल्याचे दिसून येतात. काही ठिकाणी तर संरक्षक कठडय़ांच्या खालचा रस्ताच खचल्याने संरक्षक कठडे कोसळल्याची स्थिती आहे.
चांदसैलीचा घाट धडगाव तालुक्याला कोठारमार्गे सर्वात कमी अंतरांच्या रस्त्याने जिल्हा मुख्यालयाला जोडतो. त्यामुळे धडगाव ते नंदूरबार जाणारे प्रवासी याच मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे वेळेची व इंधनाचीदेखील बचत होते.यामुळे या घाटात दिवसभर शेकडो वाहनांची वर्दळ असते. तीव्र उताराच्या वळणांवर वाहने वेग पकडतात. घाटातील रस्त्याच्या एका बाजूला 800 ते 1 हजार फुटाची खोल दरी आहे. अनियंत्रित वाहने या खोल दरीत कोसळू नयेत, यासाठी घाटात संरक्षक कठडे बसविण्यात आली आहेत. मात्र घाटातील संरक्षक कठडय़ांच्या दुरावस्थेमुळे कठडे असून नसल्याची स्थिती आहे. एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास ते दुरवस्था झालेल्या कठडय़ांमुळे दरीत कोसळण्यापासून वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे.तळोदा व धडगावला जोडणा:या चांदसैली घाटात वर्षभरापासून अनेक ठिकाणी संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. कठडय़ांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक घाट म्हणून चांदसैलीचा घाट परीचित आहे. अरुंद रस्ता व नागमोळी वळणे यामुळे या घाटात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. घाटात वाहनांचा अपघात होऊन वाहन खोल दरीत कोसळू नये यासाठी ठिकठिकाणी संरक्षक कठडे बसविण्यात आली आहे. परंतु वर्षभरापासून चांदसैली घाटात अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या या संरक्षक कठडय़ांची दुरावस्था झाली आहे.अनेक ठिकाणचे संरक्षक कठडे हे उभ्या पोलवरून निखळून खाली पडलेले आहेत़ तर काही ठिकाणी नुसतेच कठडय़ांचे लहान पोलच उभे असल्याचे दिसून येतात. 

Web Title: Accidental Risk of Accidental Deaths in Chandsalee Ghat Due to Accidental Risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.