चांदसैली घाटमार्ग खचल्याने अपघाती धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:56 PM2018-09-03T15:56:48+5:302018-09-03T15:56:56+5:30

चांदसैली घाट : रिपरिप पावसामुळे समस्या, जीव मुठीत घेऊन होतोय प्रवास

Accidental risk due to the loss of Chandsalei Ghat route | चांदसैली घाटमार्ग खचल्याने अपघाती धोका

चांदसैली घाटमार्ग खचल्याने अपघाती धोका

Next

कोठार :  कोठार ते धडगाव दरम्यानचा चांदसैली घाटरस्ता ठिकठिकाणी खचल्याने जीवघेणा ठरत आहे.त्यामुळे प्रवाशांना घाटातील प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागत असल्याचे चित्र आहे.
सातपुडा पर्वत रांगेतील धोकेदायक असणा:या घाटांपैकी चांदसैलीचा घाट ओळखला जातो. धडगाव तालुक्याला जिल्हा मुख्यालयाला कमी वेळात तसेच कमी अंतराच्या रस्त्याने जोडण्यासाठी चांदसैली घाट महत्वाचा व मोक्याचा आहे. इंधन, वेळ व श्रमाची बचत व्हावी म्हणून वाहनधारक धडगाव येथे जाण्यासाठी चांदसैली घाटाचा अवलंब करतात, त्यामुळे दिवसभर या घाटात वाहनांची मोठय़ा संख्येने वर्दळ असते.
धडगाव तालुक्यातील जनतेसाठी महत्वपूर्ण असणा:या या चांदसैली घाटातील रस्त्याची मोठी वाताहत झाली आहे. कोठारपासून पुढे धडगावकडे जाणारा रस्ता पावसाच्या रिपरिपमुळे  ठिकठिकाणी खचलेला दिसून येत आहे. सातपायरी घाटाच्या पायथ्याशी असणा:या नागमोडी वळणावरील रस्ता मोठय़ा प्रमाणात खचला आहे. 
रस्ता खचल्यामुळे संरक्षक कठडय़ांची दुरावस्था झाली आहे. दुरावस्था झालेल्या संरक्षक कठडय़ांची दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाकडून करण्यात आली होती़ मात्र पावसाची रिपरिप व दिवसभर शेकडो वाहनाची वर्दळ यामुळे या ठिकाणचा रस्ता दिवसेंदिवस अधिकच खचत जात आहे. मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याची स्थिती आहे. साधारणत: या ठिकाणचा रस्ता खचायला मे महिन्यात सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्ता खचण्याच्या प्रकारावर उपाययोजना करणे प्रशासनाला शक्य होत़े मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अशीच स्थिती चांदसैली गाव येण्यापूर्वीच्या उताराच्या रस्त्यालगतची आहे. वळण व रस्त्यालगतची झाडे-झुडपे यामुळे या ठिकाणचा खचलेला रस्ता वाहनधारकांना सहसा लक्षात येत नाही.
या परिस्थितीमुळे चांदसैली घाटातील वाट अधिक बिकट बनली आहे. त्यामुळे घाटातील प्रवासात प्रवाश्यांचा जीव टांगणीलाच असतो. तीव्र चढ-उतार, जीवघेणी वळणे, खोल द:या, यामुळे चांदसैली घाट हा निसर्गत:च धोकादायक आहे. त्यात संरक्षक कठडय़ांची दुरावस्था, खचलेला रस्ता यामुळे  घाटातील प्रवास अधिकच धोकेदायक बनतो. त्यामुळे प्रशासनाने घाटातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे कानाडोळा न करता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
 

Web Title: Accidental risk due to the loss of Chandsalei Ghat route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.