चोरीच्या दोन घटनांमधील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:13 AM2020-09-17T11:13:00+5:302020-09-17T11:13:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा व नंदुरबार येथील चोरीच्या दोन घटनांचा छडा लावण्यात एलसीबीला यश आले आहे. दोन्ही ...

Accused arrested in two theft cases | चोरीच्या दोन घटनांमधील आरोपी जेरबंद

चोरीच्या दोन घटनांमधील आरोपी जेरबंद

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा व नंदुरबार येथील चोरीच्या दोन घटनांचा छडा लावण्यात एलसीबीला यश आले आहे. दोन्ही चोरीतील संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
१५ सप्टेंबर रोजी शहादा शहरातील वृंदावन नगर येथे राहणारे रमेश जैन यांच्या बंद घराच्या वरच्या मजल्यावरुन घरात प्रवेश करुन २० हजार रुपये किमंतीचे लॅपटॉप व पाच हजार रुपये किमंतीचा मोबाईल असा एकुण २५ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या तीन दिवसानंतर फिर्यादी रमेश जैन यांच्या मुलीचे इंजिनिअरींगची आॅनलाईन परीक्षा असल्याने ते चिंतेत होते. अखेर जैन यांनी त्यांच्या घरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहिले असता सी.सी.टी.व्ही.मध्ये १५ रोजी रात्रीच्या वेळेस एक संशयीत चोरी करीत असल्याचा सर्व प्रकार रेकॉर्ड झालेला होता. फुटेज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मोबाईलद्वारे पाठविल्याने नवले यांनी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेवुन तात्काळ तपासाची चक्रे फिरवत पथकास सदरच्या ठिकाणी घटनेची माहिती घेण्यासाठी रवाना केले. चोरटा शहादा तालुक्यतील चिरखान गावाचा सुकलाल शेमळे असल्याचे निष्पन्न झाले. चिरखान येथील शेतातून त्यास ताब्यात घेण्यात आले. गवतता लपविलेला लॅपटॉपही ताब्यात घेतला.
दुसरी चोरीची घटना नंदुरबार शहरातील खिलाफत चौकातील सैय्यद सादिकअली कमरअली रा. खिलाफत चौक, नंदुरबार यांच्या घरी घडली. त्यांच्या घरातून चार मोबाईल चोरीस गेले होते. एलसीबीने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे नंदुरबार शहरातील फुले पुतळा परीसरातुन एका अल्पवयीन संशयीतास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्याने त्याचा अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातुन तीन मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, राकेश मोरे, अविनाश चव्हाण, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, शोएब शेख, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.
 

Web Title: Accused arrested in two theft cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.