भातकी येथे बिबटय़ा जेरबंद करण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:10 PM2018-04-28T13:10:02+5:302018-04-28T13:10:02+5:30
पिंजरा लावून पकडले : मकईच्या शेतात आढळल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : खेतिया-बायगोर रस्त्यावरील भातकी गावाजवळ शुक्रवारी बिबटय़ाला जेरबंद करण्यात आल़े परिसरातील लालकृष्ण गोविंद पाटील यांच्या मकईच्या शेतात हा बिबटय़ा आढळला़ उपवनक्षेत्रपाल राजकमल आर्य यांनी पिंजरा लावून बिबटय़ाला जेरबंद केल़े
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास लालकृष्ण पाटील यांना बिबटय़ाच्या दर्शन झाल़े बिबटय़ाला पाहून भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी ही घटना परिसरातील ग्रामस्थांना तसेच वनविभागाच्या अधिका:यांना कळवली़ बिबटय़ा दिसल्याचे समजताच उपवन क्षेत्रपाल राजकमल आर्य यांनी आपल्या कर्मचा:यांना घेऊन घटनास्थळ गाठल़े परंतु या ठिकाणी बिबटय़ा दिसून न आल्याने त्यांनी परिसरात एक पिंजरा लावून त्यात जिवंत कुत्रा ठेवण्यात आला़ यावेळी कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाज ऐकून मकईच्या शेतात लपून असलेला बिबटय़ा बाहेर आला़ पिंज:यात कुत्र्याला पाहून त्यावर झडप घालण्यासाठी तो कैद होताच पिंज:यात अडकला़
वनविभागाच्या कर्मचा:यांनी सुमारे अर्धाच तासात बिबटय़ाला जेरबंद करण्यात यश मिळवल़े गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात बिबटय़ासह इतरही हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याचे दिसून येत आह़े त्यासाठी पानसेमल, खेतिया वनविभागाचे कर्मचारी नियमीत स्वरुपाने गस्त करीत असतात़ त्याच प्रमाणे बिबटय़ा दिसताच वनविभागाला कळवावे असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत असत़े