आचारसंहिता भंग झाल्यास कारवाई : नंदुरबार पालिका निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 10:41 AM2017-12-02T10:41:31+5:302017-12-02T10:41:37+5:30
अधिका:यांच्या सुचना : उमेदवार, पदाधिका:यांची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आचारसंहिता भंग होणार नाही याकडे सर्वानी गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. थेट गुन्हे दाखल करण्यासारखी कारवाई होऊ शकते. त्यामुळे याबाबत गांभिर्याने घेणे आवश्यक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी निमा आरोरा व सहायक अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीतील उमेदवार, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, सहायक निवडणूक अधिकारी शैलेंद्र गवते, पोलीस निरिक्षक मथुरे आदी उपस्थित होते. यावेळी निमा आरोरा व गोविंद शिंदे यांनी आचारसंहितेची अंमलबजावणीबाबत माहिती दिली. मिरवणुका, रॅली किंवा प्रचार फेरी काढतांना आधी परवाणगी घेणे आवश्यक आहे. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. लहान मुले किंवा पक्षी, प्राणी यांचा उपयोग करू नये. मतदारांना देण्यात येणा:या ओळखचिठ्ठया या को:या कागदावरच दिल्या जाव्या. त्यावर पक्ष चिन्ह किंवा उमेदवारांचा नामनिर्देश नसावा यासह इतर बाबींसदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उमेदवार व पदाधिका:यांनी काही शंका व प्रश्न उपस्थित केले. त्यांचेही निरसन यावेळी करण्यात आले. मतदान यंत्राबाबत देखील काही जणांनी शंका उपस्थित केली. त्यामुळे अधिका:यांनी थेट मतदान यंत्रच सभागृहात आणून त्यावर प्रात्यक्षिक करून दाखविले.