नियमबाह्य सॅनेटायझर विक्रीमुळे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:51 PM2020-04-20T12:51:52+5:302020-04-20T12:52:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विक्री करण्यात येणाऱ्या सॅनेटायझरच्या बॉटलवर शासकीय नियमानुसार माहिती दिली नसल्याने वैधमापनशास्त्र विभागाने १२ ठिकाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विक्री करण्यात येणाऱ्या सॅनेटायझरच्या बॉटलवर शासकीय नियमानुसार माहिती दिली नसल्याने वैधमापनशास्त्र विभागाने १२ ठिकाणी कारवाई केली़ वैधमापन शास्त्र विभागाच्या निरीक्षकांनी शुक्रवारी ही कारवाई केली होती़
कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तू म्हणून सॅनेटायझरचा समावेश झाला आहे़ या पार्श्वभूमीवर वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी सातत्याने जिल्ह्यात भेटी देत आहेत़ यांतर्गत शुक्रवारी शहादा, नंदुरबार आणि तळोदा येथे तपासणीअंती कारवाई करण्यात आली़ नंदुरबार शहरात अजय मेडीकल, आऱजी़जगताप मेडिकल, शहादा येथे उपकार मेडिकल, जवाहर मेडिकल तर तळोदा येथे अरिहंत मेडिकल यासह १२ ठिकाणी तपासणीदरम्यान विक्रीसाठी ठेवलेल्या सॅनेटायझरवर शासनाने निर्धारित केलेली घोषणा नसल्याचे आढळले होते़ याप्रकरणी न्यायालयात खटले दाखल होणार असल्याचे माहिती वैधमापनशास्त्र विभागाने कळवले आहे़ ही कारवाई तळोदा विभागाचे निरीक्षक अनिल गोसावी, नंदुरबार विभागाचे निरीक्षक विनोद सभादिंडे, योगेश शिंदे, सोमा सोनवणे यांच्या पथकाने केली़
जिल्ह्यात गेल्या महिनाभरात वैधमापनशास्त्र विभागाने कारवाईचे सत्र सुरु केले असले तरी त्यांच्याकडून केवळ बॉटलच्या बाहेरील शिर्षक आणि उत्पादनाची माहिती घेण्यात येते़ यातून आतापर्यंत २० ठिकाणी कारवाई झाली आहे़ यातून आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने बनावट सॅनेटायझर्स विक्रीची चौकशी करण्याची गरज आहे़ जिल्ह्यातील विविध भागात बनावट सॅनेटायझर्सची विक्री आणि साठा उपलब्ध असल्याची माहिती सातत्याने समोर येऊन कारवाई टळत आहे़