कुष्ठरोगींच्या सेवेसाठी नंदुरबारात ‘अॅक्शन प्लॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:53 PM2018-06-08T12:53:47+5:302018-06-08T12:53:47+5:30
नंदुरबार : जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रशासनाने यंदाही पावले उचलली असून जुलै ते ऑक्टोबर यादरम्यान कुष्ठरोगमुक्तीचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आह़े गेल्या तीन वर्षात कुष्ठरोग निमरूलन आणि जनजागृती यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांमुळे जिल्ह्यात आजअखेर केवळ 336 कुष्ठरोगी असून यातही 1 रुग्ण हा विकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े
राष्ट्रीय कुष्ठरोग निमरूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग विकृती प्रतिबंध व सुधार सेवा शिबिराचे आयोजन करण्यात येणार आह़े आरोग्य सेवा सहायक संचालक कुष्ठरोग कार्यालय आणि अलर्ट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवण्यात येत आह़े शिबिरात रुग्णांना फिजोओथेरपी, व्ॉक्स बाथ, हाडांचा व्यायाम यासह हवाई चप्पल, गॉगल्स आणि औषधांच्या किटचे वाटप करण्यात येणार आह़े या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आशा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माण अधिकारी हे मार्गदर्शन करून रुग्णांची शुश्रूषा करणार आहेत़ या शिबिरांद्वारे जिल्ह्यातील कुष्ठरोगींमधील विकृतीचे प्रमाण कमी करून त्यांना मानाचे स्थान देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आह़े
याअंतर्गत धनराट, उमराण, डोगेगाव, ता़ नवापूर, धनाजे, चुलवड, तलई, ता़ धडगाव तर खापर, मोरंबा आणि काठी, ता़ अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जून ते ऑक्टोबर 2018 या काळात हे शिबिर होऊन मागर्दर्शन करण्यात येणार आह़े जिल्ह्यात दरवर्षी कुष्ठरोगींच्या अॅक्शन प्लॅनसोबतच त्यांना वर्षभर सेवा देता यावी म्हणून सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ तालुकास्तरावर सहा ठिकाणी हे केंद्र सुरू आहेत़ आठवडे बाजाराच्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील या सहाय्यता केंद्रात रुग्णांना सर्व प्रकारच्या सेवा कुष्ठरोग कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत़
तालुकास्तरावर असलेल्या केंद्रांमधून सातत्याने देण्यात आलेल्या सेवेमुळे जिल्ह्यातील कुष्ठरोगींच्या संख्येत घट आली आह़े 2017-18 या वर्षात 551 कुष्ठरोगी सव्रेक्षणातून समोर आले होत़े त्यांच्यावर केंद्रांमधून झालेल्या उपचारांमुळे त्यांच्या संख्येत घट येऊन आजअखेरीस जिल्ह्यात केवळ 336 रुग्ण आहेत़ त्यांच्यातील कुष्ठरोगाची शक्यता ही केवळ 33़75 टक्के असल्याचे उपचारांवरून निष्पन्न झाले आह़े
एकीकडे कुष्ठरोगींची संख्या कमी होऊन त्यांच्यातील शारीरिक व्याधी बरी होत असताना दुसरीकडे विकृत रुग्णांची संख्या केवळ 1 असल्याचे स्पष्ट झाले आह़े 100 टक्के विकृती असलेल्या रुग्णावर वडाळा येथे शस्त्रक्रिया करून त्याचे पुनवर्सन करण्यात येणार आह़े