पर्यटन विकासासाठी कृती आराखडा
By admin | Published: February 28, 2017 12:41 AM2017-02-28T00:41:19+5:302017-02-28T00:41:19+5:30
प्रकाशा, तोरणमाळ, सारंगखेड्याचा समावेश : पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती
प्रकाशा : प्रकाशा, सारंगखेडा व तोरणमाळ या तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास व्हावा, त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव त्या त्या विभागांनी विनाविलंब सादर करावे, असे आदेश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी येथे दिले.
प्रकाशा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाºयांची बैठक सोमवारी झाली. अध्यक्षस्थानी पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा नियोजन अधिकारी के.बी. जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, एम.जे. सांगळे, जि.प.चे कार्यकारी अभियंता बी.एन. पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार नितीन गवळी, जि. प. सदस्य रामचंद्र पाटील, जयपालसिंह रावल, अनिल भामरे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डी. डी. भामरे, सहायक अभियंता किशोर गिरासे, सा.बां. विभागाचे उपविभागीय अभियंता के.जी. साळुंखे, प्रकाशा-सारंगखेडा बॅरेजचे शाखा अभियंता वरुण जाधव, सहायक अभियंता ईश्वर पाटील, सरपंच भावडू ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, रफीक खाटीक, महेंद्र भोई, मंडळ अधिकारी बी.ओ. पाटील,, तलाठी जे.एन. पाटील, ग्रामविकास अधिकारी अरुण वरसाळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल यांनी विविध कामांचा आढावा घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या. तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, यावर झालेल्या चर्चेत प्रकाशासाठी जि.प. सदस्य रामचंद्र पाटील, सारंगखेड्यासाठी जि. प. सदस्य जयपालसिंह रावल तर तोरणमाळसाठी अनिल भामरे यांनी सहभाग घेतला.
१० कोटी देणार
प्रकाशा तीर्थक्षेत्री येणाºया भाविकांना मुक्कामाला थांबण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. या तीर्थक्षेत्राचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने संगमेश्वर, केदारेश्वर, गौतमेश्वर आदी मंदिराच्या ठिकाणी घाट, भक्तनिवास, चेंजिंग रूम, परिसराचे सुशोभिकरण, उद्यान, रस्ते, शेड, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन टप्प्यात १० कोटी रुपयांच्या निधीला लवकरच मंजुरी देणार असल्याचे रावल यांनी सांगितले.
प्रकाशा बॅरेजची पाहणी
प्रकाशा, सारंगखेडा व सुलवाडे बॅरेजेसमध्ये प्रचंड जलसाठा झाला आहे. त्या पाण्याचा उपयोग शेतीसह पर्यटनासाठी झाला पाहिजे. त्यासाठी तापी काठावर हॉटेल्स, रिसॉर्ट, उद्योग, बोटींगची सुविधा करणे गरजेचे आहे. त्यातून स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. प्रकाशा व सारंगखेडा येथे पर्यटन निवास अल्पदरात उपलब्ध करून भाविकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे. मंत्री रावल यांनी बॅरेज प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी शाखा अभियंता वरूण जाधव यांनी बॅरेजची माहिती देताना सांगितले की, बॅरेज निर्मितीपासून रंगरंगोटीचे काम झाले आहे. जवळपास नऊ वर्षांचा कालावधी लोटल्याने ठिकठिकाणी रंग निघाला आहे. या कामासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने आपल्या विभागाकडून तरतूद करावी, अशी विनंती जाधव यांनी केली.
रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न
प्रकाशा, सारंगखेडा व तोरणमाळ येथे येणाºया भाविक व पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांना सोयी-सुविधा पुरवून पर्यटनस्थळ म्हणून सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यातून स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मितीही होणार आहे. तोरणमाळ येथे येणाºया पर्यटकांसाठी तेथील तलावाचे सुशोभिकरण, रिंगरोड, जॉग्गििं ट्रॅक, निवासस्थानांची सोय करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच खाकराच्या पानाचे द्रोण, पत्रावळीनिर्मिती केंद्र उभारणी करून त्यातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न असल्याचे रावल यांनी सांगितले. (वार्ताहर)