विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 01:14 PM2020-10-05T13:14:47+5:302020-10-05T13:14:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. शनिवार व रविवारी जिल्ह्यात ५० पेक्षा अधीक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. शनिवार व रविवारी जिल्ह्यात ५० पेक्षा अधीक जणांवर कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतांना अनेकजण मास्क न लावता बाहेर फिरत असतात. त्याचा परिणाम स्वत:ला व इतरांनाही संसर्ग होण्यात होत आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता पोलिसांनी विना मास्क फिरणाºयांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून दररोज किमान ३५ ते ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाईच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे पोलीस कर्मचारी चौकात, रस्त्यावर तसेच गावांमध्ये जाऊन कारवाई करीत आहेत. शनिवार व रविवारी एकुण ५० पेक्षा अधीक जणांवर कारवाई करण्यात आली. कारवाईच्या भितीने लोकं तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधतांना दिसून येत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.