शहादा येथे गटसाधन केंद्रात कर्मचा:यांमध्ये हाणामारी
By admin | Published: July 2, 2017 11:12 AM2017-07-02T11:12:34+5:302017-07-02T11:12:34+5:30
गटशिक्षणाधिका:यांची मध्यस्थी. शाब्दिक वादातून प्रकार
Next
ऑनलाईन लोकमत
शहादा,दि.2 - येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटसाधन केंद्रात आस्थापन विभागाचे कर्मचारी व मानधनावरील कर्मचारी या दोघांत शाब्दिक वाद होऊन हातघाई झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. प्रभारी गटशिक्षणाधिका:यांनी मध्यस्थी करून तणाव मिटविला.
सकाळी गटसाधन केंद्राच्या आस्थापना विभागातील कर्मचा:याने मानधनावर काम करणा:या कनिष्ठ कर्मचा:याला थोडय़ा वेळाने काम करू असे सांगितल़े याचा राग येऊन दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली़ याचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी तालुक्यातील शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही घटना घडत असताना भांडण सोडवण्यास पुढाकार घेतला नाही.
या कर्मचा:यांच्या हाणामारीची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर यांना कळताच त्यांनी त्वरित दोघा कर्मचा:यांमध्ये मध्यस्थी करून भांडण सोडविले.