वाळू वाहतूकदारांना कारवाईचा ‘दणका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:41 PM2020-07-17T12:41:40+5:302020-07-17T12:41:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून जणांवर ११ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून जणांवर ११ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ चार पोेलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली़
नंदुरबार उपनगर पोलीस हद्दीत लहान शहादे ता़ नंदुरबार गावाजवळ वाळू वाहतूक करताना इमरान अयुब शेख रा़ औरंगाबाद, शेख हारुन रज्जाक शेख, गोकूळ लक्ष्मण गोरे, दयान रहेमन्नुल्ला पठाण रा़ पैठण, अजहर हुजूर शेख, संदीप कल्याण ठोंबरे, फिरोज समसोद्दीन पठाण, कचरु शामराव खुरचने, सर्व रा़ औरंगाबाद व रविंद्र रमेश कोळी रा़ दोंडाईचा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन वाळूसह ट्रक व डंपर जप्त करण्यात आले़ मंडळाधिकारी राहुल देवरे, पी़टीख़ंडारे, अनेश वळवी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ दरम्यान गुरूवारी रात्री नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर अवैध वाळू वाहून नेणारे वाहन महसूल विभागाच्या पथकाने जप्त केले होते़ यात चालक रघुनाथ भटू बाचकर व सागर सिताराम नरोटे हे दोघेही वाहनात आढळून आले होते़ त्यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े़
दरम्यान जिल्ह्यातून बाहेर पडणाºया वाहनांची तपासणी होत असतानाही वाळू वाहने धावत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ जिल्ह्याबाहेर जाताना सारंगखेडा, रनाळे, ठाणेपाडा याठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत़