निवडणुकीच्या रणांगणातील शांततेमुळे कार्यकर्ते संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:36 PM2019-11-30T12:36:43+5:302019-11-30T12:36:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर होऊन देखील जिल्ह्यातील राजकीय पातळीवर सन्नाटा दिसून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर होऊन देखील जिल्ह्यातील राजकीय पातळीवर सन्नाटा दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी अद्यापही गांभिर्याने घेतले नसल्याने कार्यकत्र्यामध्ये चलबिचलता वाढली आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यानंतर आता तरी राजकीय नेतेमंडळी कार्यकत्र्याना विश्वासात घेवून निवडणुकीच्या तयारीला लागतील अशी अपेक्षा कार्यकत्र्याकडून व्यक्त होत आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच जाहीर झाली. प्रत्यक्षात निवडणुकीचे कामकाज अर्थात अर्ज दाखल करण्याची कार्यवाही ही 18 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. यात बराच कालावधी असल्यामुळे राजकीय पातळीवर सध्या शांतता दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्षामुळे सर्वच नेतेमंडळी आणि पदाधिकारी मुंबई येथे ठाण मांडून होते. आता सत्तापेच सुटल्यानंतर तरी निवडणुकांबाबत राजकीय पक्षांनी कार्यकत्र्यामधील चलबिचलता संपवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यकत्र्यामध्ये उत्सूकता
बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे सर्वच पक्षांमधील कार्यकत्र्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीविषयी प्रचंड उत्सूकता लागून आहे. आघाडी होते का?, पक्षीय पातळीवर आणि चिन्हावर निवडणूक लढविली जाते का? कुणाला तिकीट मिळेल यासह विविध प्रश्न कार्यकत्र्याच्या मनात निर्माण होत आहेत. गावागावात याबाबत चर्चा आणि तर्कवितर्काना उधान आले आहे. राजकीय पक्षांमधील निणर्यावर गट आणि गणातील उमेदवारी अवलंबून असल्याने अनेकजणांना निर्णयाची प्रतिक्षा लागून आहे.
बैठका नाही, मार्गदर्शन नाही..
निवडणुकीसंदर्भात बैठका नाही, कार्यकत्र्याना मार्गदर्शन देखील केले जात नाही. यापूर्वी काही पक्षांनी तालुकानिहाय मेळावे घेवून कार्यकत्र्याना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यात राजकीय वातावरण आणि परिस्थिती पुर्णपणे बदलल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभर झाले आहेत.
भाजपने 26 रोजी निवडणुकांसंदर्भात व्यापक बैठक आयोजित केली होती. परंतु मुंबईतील राजकीय घडामोडींमुळे अनेक पदाधिकारी तेथे गेल्याने बैठक ऐनवेळी रद्द करावी लागली. आता लवकरच ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेच्या गोटात देखील शांतता आहे. काँग्रेसही सत्ता स्थापनेच्या पेचात अडकल्याने नेतेमंडळी मुंबईत होती. राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी निवडणुकीबाबत आहे ते पदाधिकारीही उत्सूक आहेत. इतर लहान मोठय़ा पक्षांमध्येही तयारी सुरू आहे.
जिल्हा परिषदेचे 56 गट व पंचायत समितीचे 112 गण आहेत. जास्तीत जास्त पंचायत समिती ताब्यात याव्या यासाठी राजकीय पक्षांचा प्रय} राहील. जिल्हा परिषद देखील ताब्यात यावी यासाठी प्रयत्न होतील. परंतु राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीमुळे नेतेमंडळी देखील संभ्रमात आहेत.
निवडणूक प्रक्रिया अवघ्या 15 ते 20 दिवसांवर येवून ठेपली आहे. कार्यकत्र्यामध्ये उत्सूकता आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर बैठका होऊन कार्यकत्र्यामधील संभ्रम दूर केला पाहिजे. आवश्यक त्या रणनितीसाठी व्यापक बैठक घेवून तयारी केली गेली पाहिजे. -अभिजीत पाटील, माजी जि.प.सदस्य.