मुक्त वातावरणात मतदानासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:40 AM2019-10-20T11:40:18+5:302019-10-20T11:40:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदार संघात मतदानाची तयारी पुर्ण झाली आहे. 12 लाख 26 हजार 117 ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदार संघात मतदानाची तयारी पुर्ण झाली आहे. 12 लाख 26 हजार 117 मतदार मतदान करणार असून त्यांच्यासाठी 1,385 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी सांगितले, सोमवार, 21 रोजी होणा:या मतदानासाठी तयारी पुर्ण करण्यात आली आहे. 1380 मतदान केंद्र असून पाच सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकुण 1385 मतदान केंद्र राहणार आहेत. सुमारे सहा हजार 100 कर्मचा:यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान केंद्रार्पयत पोहचण्यासाठी आणि तेथून स्ट्राँग रुमर्पयत साहित्य पोहचविण्यासाठी 107 बसेस, 606 जीप, 11 ट्रक व चार बार्ज तैणात करण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनाला जीपीएस सिस्टीम राहणार आहे. एकुण 164 क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यात अक्कलकुवा 61, शहादा 35, नंदुरबार 36 तर नवापूर 32 क्षेत्रीय अधिकारी राहणार आहेत.
तक्रारींची दखल
आचारसहिता कक्षाकडे पाच आणि सीव्हीजील अॅपवर सात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. याशिवाय 44 लाख सात हजार 605 रुपयांचा मद्यसाठा आचारसंहिता काळात जप्त करण्यात आला आहे. जवळपास दहा हजार लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस बंदोबस्त
मतदाना दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी आणि मुक्त व खुल्या वातावरणात मतदान व्हावे यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. अक्कलकुवा मतदारसंघात एक पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस निरिक्षक, 28 सहायक व उपनिरिक्षक, 339 पोलीस कर्मचारी आणि 251 होमगार्डचा समावेश आहे. शहादा मतदारसंघात एक उपअधीक्षक, दोन पोलीस निरिक्षक, 22 सहायक व उपनिरिक्षक, 270 पोलीस कर्मचारी आणि 288 होमगार्डचा समावेश आहे. नंदुरबार मतदारसंघात एक पोलीस उपअधीक्षक, तीन उपनिरिक्षक, 18 सहायक निरिक्षक व उपनिरिक्षक, 289 पोलीस कर्मचारी आणि 300 होमगार्डचा समावेश आहे. नवापूर मतदारसंघात एक उपअधीक्षक, दोन पोलीस निरिक्षक, 10 सहायक व उपनिरिक्षक, 321 पोलीस व 217 होमगार्डचा समावेश आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे उपस्थित होते.
चारही मतदारसंघाच्या मतदानासाठी एकुण 82 झोन करण्यात आले आहेत. या झोनसाठी वेगवेगळे अधिकारी आणि पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्या सोबत पोलीस कर्मचारीही असतील.
आंतरराज्य सिमेवर सहा ठिकाणी चेक नाके तयार करण्यात आले होते. तेथे सीसीटीव्हीचीही व्यवस्था होती. याव्यतिरिक्त चेक नाक्यांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत होते. त्यामुळे पारदर्शकपणा राहिला.