बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:26 AM2021-01-15T04:26:49+5:302021-01-15T04:26:49+5:30

मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास ...

Administration calls for vigilance against bird flu | बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन

Next

मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या कलम ४ (१) अन्वये प्रत्येक पशुपालक अथवा व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजीकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजीकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरूपात देणे बंधनकारक आहे.

अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. तसेच बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येऊ नये. मृत पक्ष्यांची माहिती देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (०२५६४-२१००१६ ) तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार (०२५६४-२१०२३६) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नंदुरबार यांनी केले आहे.

Web Title: Administration calls for vigilance against bird flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.