वाळू तस्करीकडे प्रशासनाचा कानाडोळा : सारंगखेडा परिसरातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:59 PM2018-03-24T12:59:25+5:302018-03-24T12:59:25+5:30
वाळूची बेसुमार अवैध वाहतूक
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 24 : तापी काठावरील टेंभातर्फे सारंगखेडा, ता. शहादा येथील नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून बेसुमार वाळू तस्करी सुरु आहे. अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी शासनाने कडक उपाय योजनेचा अध्यादेश जारी केला असला तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाळुची सर्रास लुट सुरु आहे.
महसूल विभागाने यावर्षी राज्यातील अवैध वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी नवीन अध्यादेश जारी केला आहे . शासनाच्या कडक व पर्यावरण हिताच्या अध्यादेशामुळे यावर्षी नदी पात्रातील अवैध वाळू तस्करीला आळा बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाचे कडक धोरण प्रशासनासाठी फलदायी ठरत आहे .
तापी काठावरील ससदे, ता. शहादा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला असला तरी काही दिवसांसाठी प्रशासकीय बाबीमुळे स्थगित आहे. आठवडय़ा भरात सुरु होण्याचे चिन्हे आहे. तशी प्रशासकीय हालचाली सुरु आहे. टेंभा, ता.शहादा येथील वाळुचे आगार सारंगखेडा गावापासून तीन किलो मिटर अंतरावर आहे. येथे वाळू लिलावासाठी प्रशासनाची तयारी होती. गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची तस्करी सुरु आहे. या ठिकाणी रात्रभर वाळुची वाहने सुरु असतात. येथील वाळू नंदुरबार व धुळे या दोन्ही जिल्ह्यात पोहचत आहे. 50 ते 60 ट्रॅक्टर, 10 ते 12 ट्रकांच्या साह्याने हजारो ब्रास वाळु रात्रभरात काढण्यात येते. त्यामुळे ग्रामस्थाना रात्रभर भरधाव वेगात चालणा:या वाहनाचा आवाज, व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील रस्त्याची अवस्थाही वाईट झाली आहे. त्याप्रमाणे रात्रीच मोठी माया मिळत असल्याने या व्यवसायामुळे गावात ट्रक्टराची सख्या वाढली आहे. महसुल विभागाने ही कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वाळु माफिया अधिकच सुसाट झाले आहे.