वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामास प्रशासकीय मान्यता, पालकमंत्री पाडवी यांच्या पाठपुराव्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:27+5:302021-07-17T04:24:27+5:30

वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि अनुषंगिक बांधकामासाठी टोकर तलाव शिवारातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची १९.६३ हेक्टर आर क्षेत्र हस्तांतरित ...

Administrative approval for construction of medical college and hospital, success in the follow up of Guardian Minister Padvi | वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामास प्रशासकीय मान्यता, पालकमंत्री पाडवी यांच्या पाठपुराव्यास यश

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामास प्रशासकीय मान्यता, पालकमंत्री पाडवी यांच्या पाठपुराव्यास यश

Next

वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि अनुषंगिक बांधकामासाठी टोकर तलाव शिवारातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची १९.६३ हेक्टर आर क्षेत्र हस्तांतरित करण्यात आले आहे. या जागेवर आवश्यक बांधकामासाठी प्रशासकीय मान्यतेसंदर्भातील शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. बांधकामासाठी संबंधित विभाग आणि प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेण्यात यावी. स्थापत्य कामाच्या कालावधीतच विद्युतीकरण आणि इतर अनुषंगीक कामाचे योग्य नियोजन करून कामे पूर्ण करावीत. इमारतीमध्ये दिव्यांगाना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयीबाबत शासनाच्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार संस्थेचा समावेश केंद्र शासनाच्या ‘इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू मेडीकल कॉलेज ॲटॅच्डर टू डिस्ट्रीक्ट वुईथ रेफरल हॉस्पिटल फेज-3’ मध्ये करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या लेखाशिर्षातूनही या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामामुळे जिल्ह्यासाठी उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.

गेल्या शैक्षणिक वर्षापासून नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळासाठी देखील पालकमंत्री ॲड. पाडवी पाठपुरावा करीत असून त्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Administrative approval for construction of medical college and hospital, success in the follow up of Guardian Minister Padvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.