आजवान उत्पादक शेतक:यांना मिळतेय वाढीव दरांचे ‘वरदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 05:28 PM2019-01-27T17:28:11+5:302019-01-27T17:28:15+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागातून नंदुरबार बाजार समितीत आजवान विक्रीसाठी येत असून चालू हंगामातील विक्रमी दरात त्याची खरेदी करण्यात ...

Advantage of Farmers: 'Boons' | आजवान उत्पादक शेतक:यांना मिळतेय वाढीव दरांचे ‘वरदान’

आजवान उत्पादक शेतक:यांना मिळतेय वाढीव दरांचे ‘वरदान’

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागातून नंदुरबार बाजार समितीत आजवान विक्रीसाठी येत असून चालू हंगामातील विक्रमी दरात त्याची खरेदी करण्यात येत आह़े यामुळे दुष्काळातही शेतक:यांना आजवान वरदान ठरत आह़े 
दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतक:यांचा खरीप हंगाम उत्पन्नविना गेल्याने आर्थिक नुकसान झाले होत़े यादरम्यान नंदुरबार तालुक्यासह दुर्गम भागातील आदिवासी शेतक:यांकडून 500 हेक्टर्पयत पेरणी करण्यात आलेल्या आजवानाला कमी पाण्यात फुलवण्यात शेतक:यांना यश आले होत़े यातून गेल्या महिनाभरापासून नंदुरबार बाजार समितीत आजवानची आवक सुरु असून आजअखेरीस बाजारात 3 हजार 375 क्विंटल आवक पूर्ण झाली आह़े येत्या महिनाभरापेक्षा अधिक काळ ही आवक सुरु राहणार असल्याने किमान 5 हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होऊन नवीन विक्रम होणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात येत आह़े विशेष म्हणजे यंदा बाजारात आवक झालेल्या आजवानला पहिल्या दिवसापासून प्रती क्विंटल 14 ते 18 हजार रुपये दर मिळाले होत़े या दरात आता 500 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
राज्यातील आजवान बाजारपेठ म्हणून नावरुपास येत असलेल्या नंदुरबार बाजारात सर्वाधिक खरेदी करण्यात येत़े मसाला व्यापारी आणि पूरक उद्योगांकडून मागणी असलेल्या आजवानाचे सर्वाधिक उत्पादन हे नंदुरबार आणि धडगाव तालुक्यात घेतले जात़े 60 दिवसांपेक्षा अधिकचे पीक असल्याने शेतक:यांचा कस लागतो़ काढणीनंतरही विविध प्रक्रियांसाठी वेळ लागत असूनही शेतकरी धीराने उत्पादन घेतात़ यंदा पावसाने दिलेल्या अल्प हजेरीसोबत शेतशिवारातील कूपनलिकांच्या भरवशावर आजवानचे पीक घेण्यात आले होत़े शेतक:यांना उत्पादनाची हमी असली तरी दरांबाबत मोठय़ा अपेक्षा नसताना दर 15 हजार रुपये प्रतीक्विंटलच्या पुढे मिळत असल्याने शेतकरी सुखावले आह़े दुर्गम भागातील शेतक:यांना याचा सर्वाधिक फायदा झाला आह़े नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आजवानची खरेदी करणा:याच्या व्यापा:यांची संख्या अधिक असल्यामुळे राज्यातील मोठी बाजारपेठ म्हणूनही परिचित आह़े 2014-15 च्या हंगामात बाजारपेठेत 2 हजार 372 क्विंटल आजवान आवक झाली होती़ या आजवानला 11 हजार 730 रुपये दर होता़ 2015-16 या वर्षात 4 हजार 396 क्विंटल आवक तर 12 हजार 935 रुपये प्रतिक्विंटल दर होता़ 2016-17 या वर्षात 5 हजार 370 क्विंटल आवक होऊन आजवानला 8 हजार 286 रुपये दर देण्यात आला होता़ गेल्या वर्षात दरांमध्ये उतार आल्याने शेतक:यांचे काहीअंशी नुकसान झाले होत़े परंतू यंदा दुप्पट दर मिळाल्याने शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत आह़े आजअखेरीस बाजारात 3 हजार 376 क्विंटल आजवान आवक झाल्याची माहिती आह़े 
 

Web Title: Advantage of Farmers: 'Boons'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.