अखेर चौफुलीवरील अतिक्रमण काढले

By admin | Published: March 9, 2017 11:32 PM2017-03-09T23:32:48+5:302017-03-09T23:32:48+5:30

इतर ठिकाणी जैसे थे स्थिती : बांधकाम विभागासह पालिकेनेही पुढाकार घेण्याची मागणी

After all, the encroachment on the asteroid was removed | अखेर चौफुलीवरील अतिक्रमण काढले

अखेर चौफुलीवरील अतिक्रमण काढले

Next

नंदुरबार : वाघेश्वरीचौफुलीवरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर काढले. अशीच कारवाई नवापूर चौफुली आणि करण चौफुलीवरदेखील केली तर या चौकांचेही सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, काढलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.
शहरातील वाघेश्वरी चौफुलीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. चारही बाजूंनी लहान, मोठ्या टपºया, हातगाड्या लावण्यात येत होत्या. शिवाय अनधिकृत वाहनथांबा तयार झाला होता. परिणामी या भागातील चारही रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली होती.
सहा महिन्यात तीन जणांना या ठिकाणी जीव गमवावा लागला   होता. ही बाब लक्षात घेता या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात    यावे, अशी मागणी वाढली होती. त्याची दखल घेत अखेर   चौफुलीवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.
पूर्वी या ठिकाणी कच्चे अतिक्रमण होते. त्यानंतर काहींनी त्याच ठिकाणी पक्के अतिक्रमण केले. भर रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सध्या दोंडाईचा व्हाया विसरवाडी व कुकरमुंडा अशी वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. परिणामी शहरातील चारही चौफुलींवरील वाहतूक व्यवस्था लावताना कसरत होत असते. त्यामुळे अतिक्रमण काढणे जिकिरीचे झाले होते.
पक्का रस्ता करावा
अतिक्रमण काढलेल्या जागेवर डांबरीकरण करावे व पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी अडथळे लावावे, अशी  मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी दोन वेळा अतिक्रमण काढण्यात आले. परंतु लागलीच १५ दिवसांनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत               असते.
या वेळीदेखील तसे होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
नवापूर चौफुलीवरही तीच स्थिती
शहरातील नवापूर चौफुलीवर तीच स्थिती निर्माण झाली आहे. लगतच असलेले जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, जिल्हा परिषद यासह इतर कार्यालये पहाता या चौफुलीवरील वर्दळ वाढली आहे. त्यातच वळण रस्त्यावरील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. रहिवास अतिक्रमणासोबतच व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. शासकीय कार्यालयांचा मुख्य मार्ग असल्यामुळे नेहमीच मोर्चा, रॅली या भागातून जात असते. त्यामुळे अडथळे येत असतात. या ठिकाणचे अतिक्रमण  काढण्यात यावे, अशी मागणी होत                        आहे.
हीच स्थिती शहादा रस्त्यावरील करण चौफुलीची झाली आहे. या चौफुलीवर अतिक्रमण वाढले आहे. वाढती रहदारी लक्षात घेता या चौफुलीचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढल्यानंतरच ते शक्य होणार            आहे.

२५ अतिक्रमणांवर हातोडा
वाघेश्वरी चौफुलीवरील जवळपास २० ते २५ कच्ची अतिक्रमणे काढण्यात आली. काही टपºया अद्यापही उभ्याच.
पालिकेने ठेवलेले तक्रार निवारण केंद्राची लोखंडी टपरी तेथेच पडून. एकही दिवस हे केंद्र सुरू झाले नाही. परिणामी भंगारात जाणार लोखंडी टपरी.
अतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा व्यावसायिक जागा बळकावणार नाही यादृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज.
नवापूर व कोरीटनाका चौफुलीवर अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची नागरिकांकडून मागणी.

Web Title: After all, the encroachment on the asteroid was removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.