पुलाचा भराव वाहून गेल्याने एस.टी. बसेसह वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:28 AM2019-07-11T11:28:41+5:302019-07-11T11:28:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील खरवड ते मोड गावादरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाचा भराव पुरामुळे खचल्याने या मार्गावरील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील खरवड ते मोड गावादरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाचा भराव पुरामुळे खचल्याने या मार्गावरील एस.टी. बसेस बंद झाल्या आहेत. त्यामुळे विद्याथ्र्यासह प्रवाशांचे हाल होत आहेत.
खरवड ते मोड दरम्यान नाल्यावर असलेल्या पुलाचा भराव पुरामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली असून एस.टी. बसेसही बंद झाल्या आहेत. परिणामी विद्याथ्र्याना पायपीट करावी लागत आहे. बसेस बंद झाल्याने प्रवाशांनाही खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. याठिकाणी तातडीने भराव करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी पं.स. सदस्य नंदूगीर गोसावी यांच्यासह नागरिकांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.जे. वळवी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कोठवा नाल्यावर पुलासाठी प्रस्ताव पाठवला असून मंजुरी आल्यानंतर पुलाचे काम सुरू होईल. आता मात्र जिल्हा नियोजनच्या निधीतून दुरूस्तीचे काम करण्यात येईल, असे सांगितले.