अवघ्या अडीच मिनीटांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री सारंगखेडातून रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 04:39 PM2018-12-26T16:39:06+5:302018-12-26T16:39:11+5:30
नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथील चेतक फेस्टीवलला भेट देत अवघ्या अडीच मिनीटांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथून रवाना ...
नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथील चेतक फेस्टीवलला भेट देत अवघ्या अडीच मिनीटांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथून रवाना झाल़े चेतक फेस्टीवल अवघ्या काही वर्षामध्येच नावारुपाला येऊन ‘नॅशनल इव्हेंट’ ठरला असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितल़े
बुधवारी सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली़ या वेळी सोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, ग्रामविकास मंत्री दादासाहेब भुसे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ़ हिना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, फेस्टीवलचे आयोजक जयपालसिंग रावल आदी मान्यवर उपस्थित होत़े अवघ्या अडीच मिनीटांच्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, चेतक फेस्टीवलला अल्पावधीच आंतरराष्ट्रीय स्वरुप आले आह़े येथे 1 कोटींहून अधिक किंमतीचे घोडे असून अश्वप्रेमींसाठी ही एक परवणीच असल्याचे त्यांनी सांगितल़े या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अश्वनृत्याचा आनंद घेतला़ तसेच त्यांनी अकोला ते सारंगखेडा अशी घोडसवारी करणा:या 11 वर्षीय राजवीर नागला याचाही सत्कार केला़