अक्कलकुवा येथे कुलूप लावल्याने विद्यार्थी अडकला वर्गखोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 06:24 PM2018-08-08T18:24:23+5:302018-08-08T18:24:28+5:30
तळोदा जि़प़ शाळा : दिवसभर जायबंदी, नागरिकांनी काढले बाहेर
तळोदा : तळोदा शहरातील अक्कलकुवा रोडावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सकाळपासून ते सायंकाळर्पयत आठ वर्षीय विद्यार्थी कोंडला गेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़ मुलाचे नाव हर्षल असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े तो काठी येथील रहिवासी असून तळोदा येथील मिशन वसतिगृहातील विद्यार्थी असल्याची माहिती आह़े
तळोदा येथील अक्कलकुवा रोडावर असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मधील हा विद्यार्थी सकाळपासून वर्गात कोंडला गेला होता़ उपाशीपोटी असल्याने तसेच भेदरलेला असल्याने त्याला बोलताही येत नव्हत़े सायंकाळी परिसरातील नागरिकांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली़ वर्गात विद्यार्थी अडकला असून वर्गखोलीला कुलूप असल्याचे या वेळ दिसून आल़े लहान मुलाची अवस्था बघून अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला़ संबंधित शिक्षक तसेच इतर कर्मचारीहीसुध्दा या ठिकाणी येण्यास तयार नसल्याने उपस्थित नागरिकांनी कुलूप तोडून विद्याथ्र्याला बाहेर काढल़े
विद्याथ्र्याची मुक्तता केल्यानंतर उपस्थितांनी त्याचे नाव विचारल़े त्याने त्याचे नाव हर्षल असे सांगितले असून भेदरलेला असल्याने त्याला अधिकची माहिती सांगता आली नाही़ विद्यार्थी मुळचा काठी येथील असून मिशन वसतीगृहात तो वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली़ दरम्यान, हा विद्यार्थी शाळेच्या वर्गखोलीत कसा अडकला याबाबत अधिकचा तपास करण्यात येत आह़े उपस्थित नागरिकांनी विद्याथ्र्याला वसतिगृहात सोडल़े