दोन किलोमीटर पाठलागानंतर पोलीसांनी पकडले चार लाखांचे मद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 04:58 PM2019-06-28T16:58:16+5:302019-06-28T16:58:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मध्यप्रदेशातून चिंचखेडी ता़ धडगाव येथे विक्रीसाठी जाणारे अवैध मद्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ...

After two kilometer chase, four lakhs of liquor was caught by the police | दोन किलोमीटर पाठलागानंतर पोलीसांनी पकडले चार लाखांचे मद्य

दोन किलोमीटर पाठलागानंतर पोलीसांनी पकडले चार लाखांचे मद्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मध्यप्रदेशातून चिंचखेडी ता़ धडगाव येथे विक्रीसाठी जाणारे अवैध मद्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन किलोमीटर पाठलाग करुन ताब्यात घेतल़े बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास धडगाव ते जलोला दरम्यान ही कारवाई करण्यात आली़ कारवाईत पोलीसांनी आठ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आह़े  
धडगाव ते जलेला रस्त्यावरुन अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना बुधवारी  मिळाली होती़ त्यांनी तात्काळ पथकाला धडगाव येथे कारवाईसाठी पाठवल़े यानुसार पथकाने धडगाव ते जलोला रस्त्यावर सोनगाव पुलाजवळ सायंकाळपासून सापळा रचला होता़ रात्री 11 वाजेच्या सुमारास पथकाला जलोला गावाकडून अज्ञात वाहन येत असल्याचे दिसून आले होत़े  पथकाने वाहनाला थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने वेग वाढवत पळ काढला़ पथकाने वाहनांसह तब्बल दोन किलोमीटर पाठलाग केल्यानंतर वाहन ताब्यात घेतल़े दरम्यान चालकाला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़ 
पथकाने वाहनाची तपासणी केली असता, त्यात  मध्यप्रदेश राज्यात विक्री परवाना असलेली 1 लाख 41 हजार 600 रुपये किमतीचे बियरचे 59 बॉक्स, 1 लाख 92 हजार रुपये किमतीचे अवैध व्हिस्कीचे बॉक्स तसेच 4 हजार 75 रुपयांचे इतर मद्य आढळून आल़े पथकाने चार लाख रुपयांच्या या अवैध मद्यासह त्याची वाहतूक करणारे चार लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला़ 
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी  यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश सोनवणे, दिपक गोरे, विनोद जाधव, विकास अजगे, जितेंद्र तांबोळी यांनी केली़ 

पथकाने लिचा डेडय़ा पटले रा़ तेलखेडी यास ताब्यात घेतल़े पोलीस पथक पाठलाग करत असताना मद्य वाहून नेणा:या वाहनातून एकजण पसार झाला होता़ दोघांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयित लिचा यास धडगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांच्या ताब्यात देण्यात आल़े 
 

Web Title: After two kilometer chase, four lakhs of liquor was caught by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.