कृषी तंत्रज्ञानाला स्थानिक स्थितीची जोड हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:26 PM2017-10-16T13:26:05+5:302017-10-16T13:26:05+5:30
शेतकरी मेळावा व चर्चासत्र : विद्यापीठातील शास्त्रज्ञ व अभ्यासकांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नवीन कृषी तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी कृषी तंत्रज्ञांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा येथील शासकीय कृषी महाविद्यालयात आयोजित शेतकरी मेळावा व चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केली.
कृषी महाविद्यालयात संकल्प से सिद्धी, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या संकल्पनेतून राहुरी कृषी विद्यापीठअंतर्गत शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. उद्घाटन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ.शरद गडाख, प्रकल्प संचालक मधुकर पन्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोंडे, विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रमोद रसाळ, डॉ.प्रकाश तुरबतमठ, पी.टी.सूर्यवंशी उपस्थित होते.
मेळावा आणि चर्चासत्रात शेतक:यांना विविध बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले. शेती आणि त्यातील नवीन तंत्रज्ञान यावर भर देण्यात आला. यावेळी बोलतांना आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले, शेती विकासाच्या विविध योजनांचा उपयोग करून शेतक:यांनी आपले उत्पादन वाढवावे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि अधिका:यांचा सल्ला घ्यावा. त्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापरकरून हंगाम विरहित पिकांचे उत्पादनाचेही आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी जिल्ह्यात असलेल्या दोन कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान अवलंबवावे व त्याचा उपयोग स्थानिक ठिकाणी शेतक:यांनी करून घ्यावा. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी कृषी व संलगA विभागाने प्रय}शील राहावे असेही आवाहन त्यांनी केले.
डॉ.अशोक फरांदे यांनी कृषी विद्यापीठाद्वारे मागील 50 वर्षात निर्माण केलेले नवीन तंत्रज्ञान शेतक:यांर्पयत पोहचविण्यात येत आहे. महाविद्यालयात कृषी माहिती तंत्रज्ञान प्रांगणाची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ.शरद गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध पिकांच्या नवीन वाणांची माहिती दिली. शेतक:यांनी कृषी संलगA व्यावसायाला प्राधान्य द्यावे. एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचेही आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रगतशिल महिला शेतकरी आशाबाई कोमलसिंग राजपूत, हिंमतराव माळी यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचलन प्रा.जे.एस.सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा.राजेनिंबाळकर यांनी मानले