अहिर सुवर्णकार समाजातर्फे विद्याथ्र्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:53 AM2019-08-26T11:53:58+5:302019-08-26T11:54:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजाच्या गुणवंत विद्याथ्र्याचा गुणगौरव व स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजाच्या गुणवंत विद्याथ्र्याचा गुणगौरव व स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून धुळे महानगरपालिकेचे महापौर चंद्रकांत सोनार तर अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महिला अध्यक्षा पुष्पा सोनार तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय बागुल, किरण पातोंडेकर, शशिकांत विसपुते, भालचंद्र दुसाने, विजय अहिरराव, सूर्यकांत रणधीर, शेखर वानखेडे, गोपल सोनार, राष्ट्रीय सचिव डॉ.भरत वाघ, विनोद अहिरराव, दीपक पाटणकर, विलास बाविस्कर, मुकूंद मैंद, संजय मैंद, प्रकाश अहिरराव, अरूण विसपुते, नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, नंदुरबार प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला सोनगीरकर, शहादा अहिर सुवर्णकार समाजाध्यक्ष जीवन जगदाळे, सचिव ज्ञानेश्वर सोनार, विवेक विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर समाजातील गुणवंत विद्याथ्र्याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी सुरेश सोनार यांनी चित्रकला स्पर्धा घेतली. या स्पर्धेचे परीक्षण भूषण सोनार व दिपाली सोनार यांनी केले. दरम्यान दिपाली सोनार हिने पुष्पा सोनार यांचे व्यक्तिचित्र साकारुन भेट दिले. या वेळी पुष्पा सोनार यांनी सर्व सुवर्णकारांनी संघटीत व्हावा व आपल्या मुला-मुलींच्या सुप्तगुणांना वाव द्या म्हणजे देशपातळीवर आपले नाव रोशन करा, असा संदेश दिला. सूत्रसंचालन पुरूषोत्तम विसपुते यांनी ेकले. कार्यक्रमासाठी सुनील दहिवेलकर, विजय दुसाणे, जयेश थोरात, मधुसूदन पोतदार, विजय सोनार, दीपक पिंगळे, सतीष वानखेडे, नीलेश अहिरराव, अजय वाघ, भुपेंद्र विसपुते, चंद्रकांत दुसाणे यांनी परिश्रम घेतले. आभार सुभाष विसपुते यांनी मानले.