अखिल नंदुरबार प्राथ. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:23 AM2021-01-13T05:23:00+5:302021-01-13T05:23:00+5:30

नंदुरबार : अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली. दरम्यान, राज्याचे ...

Akhil Nandurbar Prath. A delegation of teachers met Chief Executive Officer Gawde | अखिल नंदुरबार प्राथ. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांची घेतली भेट

अखिल नंदुरबार प्राथ. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांची घेतली भेट

Next

नंदुरबार : अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली.

दरम्यान, राज्याचे सल्लागार सुरेश भावसार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा पडोळ, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी ८५ निमशिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू केली तर ७३ शिक्षकांनी पदोन्नती नाकारल्या बद्दल त्यांची वरिष्ठ वेतन श्रेणी काढून घेतली होती. त्याला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. परंतु हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी मंत्रालय पातळीपर्यंत तसेच आयुक्त साहेब यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच वरिष्ठ निवड श्रेणीचे अधिकार गटविकास अधिकारी यांना बहाल केले आहेत. हे तिन्ही प्रश्न दोन वर्षांपासून अनिर्णीत होते.

या प्रश्‍नांसाठी अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ सातत्याने पाठपुरावा करत होते. हे प्रश्न निकाली काढल्याबद्दल संबंधितांचे आभार मानले. यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित महत्त्वाच्या प्रश्नांविषयी चर्चाही करण्यात आली.

सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने तयार करण्याबाबत.

प्राथमिक शिक्षकांचे सेवानिवृत्ती प्रस्ताव तयार करताना प्रत्येक कागदांवर गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी व नंतर कार्यालयीन अधीक्षक, सहायक गटविकास अधिकारी व गटविकास अधिकारी असा प्रस्ताव हाताळला जातो. याला खूप वेळ लागतो. या सर्वांवर सह्या ह्या सर्विसबुक वरून पडताळणी करून गटविकास अधिकारी यांना परत सर्व पानांवर स्वाक्षरी करण्यासाठी ठेवावे लागते. म्हणून यासाठी फक्त सेवानिवृत्त शिक्षकांचे अंतिम प्रस्ताव सादर करताना ते गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने मंजूर करून मुख्यालयास पाठविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांची सेवानिवृत्त प्रकरणे वेळेत निकाली निघून सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांची सेवानिवृत्त वेतन व इतर लाभ वेळेत प्रदान करण्यात येतील याकरिता हा अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण ऑनलाइन सुरू करण्याबाबत - वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र ठरणाऱ्या परंतु प्रशिक्षण न झालेल्या प्राथमिक शिक्षकांची यादी तालुका स्तरावरून मागवून प्राचार्य डायट नंदुरबार यांना देण्यात यावी असे सुचविण्यात आले, प्राथमिक शिक्षकांचे वेतन नियमित पाच तारखेच्या आत होणे, प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विषय शिक्षक यांच्या पदोन्नतीसाठीच्या सेवा ज्येष्ठता याद्या अद्यावत तयार करून जाहीर करणे, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरणे, दिव्यांगांचा अनुशेष शासन निर्णयानुसार प्रत्येक प्रकारच्या दिव्यांगातून एक टक्के प्रमाणे भरण्यात यावा, प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी खात्यावर दरमहा हप्ता जमा होण्याच्या नोंदी दोन ते तीन वर्षाच्या अपूर्ण आहेत त्या लेटरमध्ये पूर्ण करून हिशोबाच्या पावत्या मिळाव्यात, भविष्य निर्वाह निधी अग्रीमचे प्रलंबित प्रस्ताव व प्रलंबित वैद्यकीय बिले मंजूर करण्यात यावेत, शालेय पोषण आहारांतर्गत मे २०१९ चे दुष्काळग्रस्त भागात वाटप केलेल्या पुरस्काराचे बिल तत्काळ मिळण्यासह विविध विषयांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

या भेटीत व चर्चेत राज्य सल्लागार सुरेश भावसार, जिल्हाध्यक्ष मोहन बिसनारिया, जिल्हा सरचिटणीस अशोक देसले, जिल्हा उपसरचिटणीस उमेश कोळपकर, शहादा तालुका सरचिटणीस रवींद्र बैसाणे, नंदुरबार तालुका सरचिटणीस विशाल पाटील, नंदुरबार तालुका कार्याध्यक्ष कल्पेश गोसावी हे उपस्थित होते.

या वेळी जिल्हा सरचिटणीस अशोक देले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचे आभार मानले.

Web Title: Akhil Nandurbar Prath. A delegation of teachers met Chief Executive Officer Gawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.