अक्कलकुवा आगारास दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:15 PM2019-10-27T12:15:11+5:302019-10-27T12:15:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्गम भागातील रस्ते तुटले. परिणामी अक्कलकुवा आगारामार्फत त्या भागातील 40 बसफे:या ...

Akkalkuwa Agar hits 1.5 crores | अक्कलकुवा आगारास दीड कोटींचा फटका

अक्कलकुवा आगारास दीड कोटींचा फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्गम भागातील रस्ते तुटले. परिणामी अक्कलकुवा आगारामार्फत त्या भागातील 40 बसफे:या बंद  करण्यात आल्या. तीन महिन्यांपासून बस बंदच आहे, यातून आगाराचे दीड कोटींचे नुकसान झाले आहे.
धडगाव व मोलगी परिसरातील वाहतुक सुविधेत प्रामुख्याने अक्कलकुवा आगाराच्याच बसेस अधिक होत्या. या आगारामार्फत एका दिवसात मोलगी, धडगाव, जमाना, भगदरी, बिजरीगव्हाण, कोठली व असली यासह विविध ठिकाणी बस सोडण्यात येत होत्या. परंतु ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे देवगोई घाटात तब्बल 13 ठिकाणी संपूर्ण रस्ता तुटला व दरडी कोसळल्या. त्यामुळे अक्कलकुवा ते मोलगी भागातील वाहतुक सेवा बंद करण्यात आली होती. त्यात परिवहन महामंडळाच्या बसेसचा देखील समावेश होता. सद्यस्थितीत काही अंशी रस्ता दुरुस्त झाला असला तरी बसच्या वाहतुकीसाठी हा रस्ता योग्य नाही. त्यामुळे अक्कलकुवा आगाराच्या या भागातील 40 बसफे:या तीन महिन्यांपासून बंदच आहेत. 
आगाराला एका बसफेरीतून सरासरी चार हजाराचे उत्पन्न मिळत होते. तर 40 बसफेरीच्या माध्यमातून एक लाख 60 हजाराचे दैनंदिन नुकसान होत आहे. बसफे:या बंद होऊन आज तीन महिन्याच्या कालावधी होत आला आहे. त्यामुळे या कालावधीत आगाराचे दीड   कोटींचे नुकसान झाल्याचे अक्कलकुवा आगार व्यवस्थापनामार्फत सांगण्यात आले. हा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असले तरी बस सुरु करण्यासाठी कदाचित वर्षही उलटू शकते. त्यामुळे पुन्हा नुकसानीचा टक्का वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. 
दिवाळीच्या हंगामात प्रवाशांची संख्या वाढते, वाढत्या गर्दीमुळे सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या कालावधीत प्रत्येक प्रवाशाला नियोजित ठिकाणी सुखरुप पोहोचता यावे, यासाठी प्रत्येक एसटी आगारामार्फत ज्यादा बसेस सोडल्या जातात. त्यातून त्या-त्या आगाराच्या उत्पन्नात वाढ होते. दिवाळीच्या हंगामात अक्कलकुवा आगाराला उत्पन्न मिळत असले तरी दिवाळीनिमित्त भरणारी एकमेव अस्तंबा यात्रेला जाणा:या भाविकांसाठी आगाराला बसेस सोडता आल्या नाही. त्यामुळे आगाराला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

दिवाळीनिमित्त धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे एकमेव यात्रा भरत असते. एकमेव यात्रेमुळे अस्तंबा येथे जाणा:या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे अक्कलकुवा आगारामार्फत या यात्रेसाठीच दरवर्षी वाढीव बसेस सोडल्या जातात. त्यातून आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ होते, शिवाय भाविकांची देखील सोय होत असते. परंतु यंदा रस्ताच खराब झाल्यामुळे अस्तंबा भागातील बसफे:या बंद करण्यात आल्या असून यातून मिळणारे मोठे उत्पन्नही आगाराला सहन करावे लागत आहे. 
 

Web Title: Akkalkuwa Agar hits 1.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.