अक्कलकुवा व खापर कडकडीत बंद : आदिवासी संघटना व शिवसेनेने केले होते आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 01:09 PM2018-01-21T13:09:07+5:302018-01-21T13:09:17+5:30

Akkalkuwa and Khapar were closed in Kadkadi: Appeal appealed by tribal organizations and Shivsena | अक्कलकुवा व खापर कडकडीत बंद : आदिवासी संघटना व शिवसेनेने केले होते आवाहन

अक्कलकुवा व खापर कडकडीत बंद : आदिवासी संघटना व शिवसेनेने केले होते आवाहन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा/खापर : नवोदय विद्यालयातील दहावीची विद्यार्थीनी जागृती पावरा हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी अक्कलकुवा व खापर येथे शनिवारी बंद पाळण्यात आला. दोन्ही ठिकाणी 100 टक्के बंद यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी व आदिवासी महासंघाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ अक्कलकुवा बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती. बंदच्या हाकेला साद देत अक्कलकुवा, खापरसह परिसरातील व्यापा:यांकडून सदर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवनेरी चौक, मुख्य बाजारपेठ ,भाजी मार्केट, आमलीबारी रोड, तळोदा नाका, फेमस चौक, ङोंडा चौक परदेशी गल्ली, बस स्टेशन परिसर तसेच संपुर्ण  शहरातील व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहभाग घेतला.  
बंदमुळे सकाळी कामानिमित्त आलेल्या खेडय़ापाडय़ातील आदिवासी  बांधवांची तसेच फेरिवाल्यांची गैरसोय झाली मात्र त्यांना बंदची माहिती मिळताच तेही आपल्या गावी माघारी गेले.
नवोदय विद्यालयाचे प्रशासकीय प्रमुखांसह  घटनेला जबाबदार असुन त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच घटनेतील जबाबदार कर्मचा-यावर कडक शासन करावे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी राज्यपालाना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी , डॉ. विक्रांत मोरे, तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी युवा जिल्हाधिकारी विनोद वळवी, गिरधर पाडवी, राजेंद्र पाडवी अल्पसंख्यांक शिवसेना तालुका प्रमुख आशिफ मक्राणी, शहर प्रमुख शाकिब पठाण तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
खापरलाही कडकडीत बंद
खापर येथेही सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील बाजारपेठ, बसस्थानक परिसातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पंचक्रोशीतून आलेल्यांचे यामुळे मोठे हाल झाले. बंदचे आवाहन आदिवासी महासंघातर्फे करण्यात आले होते. 

Web Title: Akkalkuwa and Khapar were closed in Kadkadi: Appeal appealed by tribal organizations and Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.