मारहाण प्रकरणी अक्कलकुवा न्यायालयाचा दोघांना सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:07 PM2018-06-30T13:07:22+5:302018-06-30T13:07:42+5:30

Akkalkuwa court acquitted both of them for rigorous imprisonment | मारहाण प्रकरणी अक्कलकुवा न्यायालयाचा दोघांना सश्रम कारावास

मारहाण प्रकरणी अक्कलकुवा न्यायालयाचा दोघांना सश्रम कारावास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकास मारहाण करून गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या दोघा आरोपींना अक्कलकुवा न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ जून 2013 मध्ये गलोठा बुद्रुक ता़ अक्कलकुवा येथे मारहाणीचा हा प्रकार घडला होता़ 
गलोठा येथील सोमला तडवी यांच्या पत्नी जशोदाबाई आणि मुलगा अजरुन यांना शेजारी राहणारे जमसर शिवराम तडवी व मुकेश जमसर तडवी हे शिवीगाळ करत होत़े सोमला तडवी यांनी याचा जाब विचारल्यावर दोघांनी सोमला तडवी यांना सळईने हाताच्या मनगटावर मारहाण करून हाड फ्रॅर केले होत़े सोमला तडवी यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात येऊन अक्कलकुवा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी अक्कलकुवा न्यायालयात जमसर तडवी आणि मुकेश तडवी या दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होत़े अक्कलकुवा न्यायालयाचे  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए़डी़ करभजन यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज झाल़े त्यांनी दोघा आरोपींना कलम 326 प्रमाणे दोषी ठरवून 1 वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रूपयांचा दंड ठोठावला़ तसेच कलम 323 प्रमाणे 1 महिना साधार कारावास आणि 1 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ आरोपींविरोधात पोलीस हवालदार प्रकाश महाले यांनी दोषारोपपत्र सादर केले होत़े सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड़ अजय मुरलीधर सुरळकर यांनी काम पाहिल़े पैरवी अधिकारी पोलीस हवालदार समश्या वळवी व पोलीस नाईक सतीदान राऊळ यांनी काम पाहिल़े 
हवालदार प्रकाश महाले व सरकारी वकील अॅड़ अजय सुरळकर यांचे पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांनी कौतूक केल़े  

Web Title: Akkalkuwa court acquitted both of them for rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.